मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

शरद पवार इनस्पायर फेलोशिप 2023

 *शरद पवार इनस्पायर फेलोशिपची घोषणा* आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने साहेबांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने 'शरद पवार इनस्पायर फेलोशीप'ची सुरुवात गेल्या वर्षी करण्यात आली आहे.


याअंतर्गत कृषी (‘Sharad Pawar Inspire Fellowship in Agriculture'), साहित्य ('Sharad Pawar Inspire Fellowship in Literature’) आणि शिक्षण (‘Sharad Pawar Inspire Fellowship in Education’) या क्षेत्रातील युवा पिढीतील गुणवंतांना आप आपल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजविण्याची संधी दिली जाते. आज आंतरराष्ट्रीय युवा दिनी 'शरद पवार इनस्पायर फेलोशीपच्या निमंत्रक’ सुप्रिया सुळे यांनी २०२३ च्या फेलोशिपची घोषणा केली. 


              'शरद पवार इनस्पायर फेलोशीप' दर वर्षी कृषि क्षेत्रात ८०, शिक्षण क्षेत्रात ४० आणि साहित्य क्षेत्रात १० युअवक युवतीना दिली जाते. www.sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर कृषी, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील फेलोशीपसाठी  दिनांक १२ ऑगस्ट २०२२ पासून ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करता येतील. अर्ज करण्याची मुदत १२  ऑक्टोबर २०२२ पर्यन्त आहे. तीनही क्षेत्रातील फेलोशिपसाठी तज्ञ परीक्षकांच्या तीन निवड समिति तयार करण्यात आलेल्या आहेत. १२ ऑक्टोबर पर्यन्त येणाऱ्या अर्जाची छाननी निवड समिति करेल. ०३ नोव्हेंबर पर्यन्त फेलोशिपसाठी पात्र उमेदवारांची नावे निश्चित होतील. या नावांची घोषणा ११ नोव्हेंबर २०२२ रोजी केली जाईल.


              २०२३ साठी निवडलेल्या फेलोजना ११ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात मा. शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत फेलोशिप प्रदान करण्यात येईल.  'शरद पवार इनस्पायर फेलोशीप' ही एका वर्षासाठी असून, निवड झालेल्या फेलोजनी निश्चित केलेल्या विषयावर एक वर्षाच्या अवधीत आपला प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित आहे. तिन्ही फेलोशिपचे अर्ज, फेलोशिप बाबतची संपूर्ण माहिती आणि  वार्षिक वेळापत्रक फेलोशिपच्या www.sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. 

"शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन एज्युकेशन " साठी एकूण ४० शिक्षकांना प्राथमिक २०,माध्यमिक २० शिक्षकांना ही फेलोशिप देण्यात येणार आहे.आपापल्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यार्या शिक्षकांना प्रोत्साहन देणे आणि त्याच्या उपक्रमास व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे.जिल्हा परिषद शिक्षक,शासकीय मान्यताप्राप्त असलेल्या संस्थेतील शिक्षक या फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात. 


महाराष्ट्रातील युवक युवतीनी नोंदणी करण्यापूर्वी वेब साईट वरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज व प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे करण्यात आले आहे.

आईचा पगार किती असावा?

 आईचा पगार किती असावा?


'Miss World' contest मधे  'हरियाणा' ची डॉ मानुषी छिल्लर हिने विजेते पद पटकाविले होते.
शेवटच्या निर्णायक राऊंड मधे तिला प्रश्न विचारण्यात आला होता की सर्वात जास्त पगार कोणत्या क्षेत्रातील लोकांना मिळाला पाहिजे? तेंव्हा तिचे 'winning' उत्तर हे होते की *"सर्वात जास्त पगार 'आई'ला मिळाला पाहिजे." आईच्या कामाचे मोल नाही*.
तिच्या या उत्तराने तिने ती स्पर्धा तर जिंकलीच. बरोबर जगात एक नवीन विषय चर्चेला दिला. त्यानंतर फोर्ब्स व्दारे  संचालित वेबसाईट 'Salary.com' वर research सुरू झाला की एक आई जेवढं काम करते, त्या कामांसाठी जर वेगवेगळी माणसे ठेवली, तर त्यांना किती पगार द्यावा लागेल? *तेंव्हा सर्व गोष्टी लक्षात घेता, एका आईचा पगार वर्षाला एक लाख पंधरा हजार डॉलर  (१,१५,००० डॉलर) असायला हवा. हा निष्कर्ष निघाला. म्हणजे तिला महिन्याला अंदाजे  ९,५०० डॉलर मिळायला हवा. म्हणजे भारतीय आईला ९,५०० × ७५ = ₹ ७,१२,५०० अंदाजे एवढा पगार मिळाला पाहिजे दरमहा*.
*तिच्या उत्तराने जगात ही  गोष्ट फक्त उजागर झाली. जगासमोर भारतीय परिवार व त्यात आईची  भूमिका समोर आली*.   आदी काळापासून आई हेच काम करते आहे रोजच, वर्षानुवर्षे. न  थकता, न थांबता  आनंदाने. कुठे ही उपकाराची भावना नाही. अहंपणा नाही. कंटाळा नाही. *ती सुखी घराची किल्ली आहे*. एकाच वेळी ती  असंख्य  departments सहज सांभाळते. सकाळ ते संध्याकाळ असंख्य काम सहज करते. अगदी काटेकोरपणे बिनबोभाट. ती घरची   Administrative officer आहे. वेळ पडली तर डॉक्टर,  टीचर, counselor आहे आणि कधी कधी हिटलरही होते. जवळ जवळ सर्व मंत्रालय  तिच्या कडेच असतात. घराची गृह मंत्री, वित्त मंत्री आहे ती. थोडक्यात घराचा भक्कम आधारस्तंभ आहे. 
तज्ञ, कोणत्या तरी एकाच क्षेत्रात perfect असतात. तज्ञ असतात. व त्यांच्या या expertise चे भरपूर पैसेही  मिळतात त्यांना. येथे प्रत्त्येक घरची आई प्रत्त्येक department किती कुशलतेने सांभाळते.
I think she is 'The Best CEO' in the world.
जगाची रीतच आहे ही. जून्या काळापासून चालत आलेली. कुठे न लिहीलेले नियमच आहेत ते. ही सर्व कामे करण्यात तिला आनंद आहे.  समाधान आहे. एखादं काम जरी नीट झालं नाही, तर ती disturb होते‌. म्हणजे अगदी भरलेला डबा शाळेत जाताना मुलगा विसरला, तरी ती अस्वस्थ होते. माझी कुठे चूक झाली? याचा विचार करते व पुन्हा असे होणे नाही. याची काळजीही घेते.
या सर्व कामाचा मला मोबदला मिळावा हा विचार तिच्या मनातही येत नाही.प्रत्येक  घरी देव पोहचू शकत नाही म्हणून आई असते. आईच्या पायाशी स्वर्ग आहे*. आईला केलेला नमस्कार देवाला पोचतो" वगैरे वगैरे हे मोठे, महान विचार पुस्तकात वाचायला मिळतात. *काळ कितीही बदलू दे, आधुनिकता किती ही असू दे, "आई" आईच राहणार आहे*. तशीच कर्तव्यदक्ष. आपल्या घराला घरपण देणारी, जीव ओवाळून टाकणारी, सांभाळणारी....!! 
🙏आवडल्यास शेयर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.