blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

Ozon day ओझोन_डे

 आज १५ सप्टेंबर

आज ओझोन डे 

जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी निसर्गाने दोन महत्त्वाच्या उपाययोजना करून ठेवल्या आहेत. त्या म्हणजे पृथ्वीभोवती चुंबकीय गोल आणि ओझोनचा थर. यातील चुंबकीय गोल अत्यंत ऊर्जस्व कणांपासून जीवसृष्टीचे रक्षण करतो, तर ओझोनचा थर जीवसृष्टीला धोकादायक असणाऱ्या अतिनील किरणांना भूपृष्ठापर्यंत येऊ देत नाही. हा ओझोनचा थर नसता तर कदाचित पृथ्वीवर जीवसृष्टीच झाली नसती. मात्र, या ओझोनच्या थरालाच वाढत्या प्रदूषणामुळे भगदाड पडले असून, ते दिवसेंदिवस आणखी मोठे होत आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी आता रोजच ‘ओझोन डे’ साजरा करण्याची वेळ आली आहे. भूपृष्ठापासून दहा किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाला तपांबर  असे नाव आहे. मेघ, वारे, पाऊस, विजांचा चमचमाट, चक्रीवादळे, वगैरे नैसर्गिक घटना याच स्तरात घडतात. तपांबराच्या पुढे ५० कि.मी.अंतरापर्यंतच्या वातावरणाच्या विभागाला स्थितांबर असे म्हणतात. वातावरणातील एकंदर ओझोनपैकी १० टक्के तपांबरात आहे, तर ९० टक्के स्थितांबरात आहे. त्यातही भूपृष्ठापासून १५-३० कि.मी. पट्ट्यात ओझोनचे प्रमाण जास्त आहे. या पट्ट्यात हवेच्या दशलक्ष रेणूंमागे २६८ रेणू ओझोनचे असतात. या ओझोनच्या स्तरामुळेच आपल्या सर्वांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते. पारंपरिक स्थितांबर (ओझोन स्तर) ला छिद्र पडण्यास कारणीभूत असणाऱ्या सीएफसी वायूचा वापर वाढला म्हणून हायड्रोफ्लोरोकार्बन (एचएफसी)चा वापर होऊ लागला. त्यातही वेगवेगळे प्रकार असल्याने जागतिक तापमानात वाढ वार्षिक सात टक्क्यांनी वाढली. जागतिक तापमानाचा धोका आणखी वाढला आहे. त्याचीच काळजी घेणे अनिवार्य बनले आहे. त्यामुळे ३६५ दिवसांमध्ये एकदाच ‘ओझोन डे’ साजरा करून हा प्रश्न सुटणार नाही. रोजच हा दिवस साजरा करावा..

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.