blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्पर्धा परीक्षा टेस्ट 142 माहिती तंत्रज्ञान

विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन पध्दती व मूल्यमापनाची तंत्रे

 दिव्यांग व्यक्तींचा अधिकार अधिनियम, २०१६ (Right of Person With Disability Act (RPWD) संदर्भात केंद्र शासनाने दि.२८ डिसेंबर, २०१६ रोजी अधिसूचना निर्गमित केली आहे. या अधिनियमातील प्रकरण ३, शिक्षण, कलम १६ व १७ व प्रकरण ६ कलम ३१ व ३२ मध्येही RTE Act, २००९ चा संदर्भ नमूद करुन विशेष शैक्षणिक गरजा असणाऱ्या बालकांमध्ये कोणताही भेदभाव न करता समावेशित शिक्षणाद्वारे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबाबत नमूद केले आहे.


बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार, अधिनियम, २००९ व भारतीय संविधान कलम ४५ नुसार शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे. वय वर्षे ६ ते १४ वर्षांच्या प्रत्येक बालकास व विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना वयाच्या १८ वर्ष वयोगटापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण विषयक सुविधा देणे आवश्यक आहे. शिक्षण विभाग अध्ययनार्थी दृष्टीकोनातून सर्वच बालकांकडे बघत असून त्यांच्याकडून अपेक्षित बदल व अध्ययन निष्पत्ती येणे आवश्यक असते यासाठी काम करत असते. त्यानुषंगाने समावेशित शिक्षणाची संकल्पना, तत्त्वानुसार व काळानुरूप होणाऱ्या बदलानुसार समावेशित शिक्षणाकडून सामान्यीकरणाकडे वाटचाल करण्यासाठी ही संकल्पना


भविष्यात विकासात्मक परिवर्तनानुसार निरंतर सुरु राहणे ही काळाची गरज आहे. त्यानुषंगाने विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन पध्दती व मूल्यमापनाची तंत्रे


ही देखील विविध अध्ययन शैलीनुसार श्रवण, दृष्य, स्पर्श, बहु अध्ययन शैली (Audio Learner, Visual Learner, Kinaesthetic Learner, Multi Learner) ३. अध्ययन शैलीनुसार असणे आवश्यक आहे. त्यासाठी अध्ययन शैलीनुसार Facilitator म्हणून वर्ग शिक्षकांनी अध्यापन करण्याची गरज आहे. विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग)

म्हणजे अंशतः अंध/पूर्णतः अंध, कर्णबधीर, भाषा व वाचादोष, अस्थिव्यंग, मानसिक आजार, अध्ययन अक्षम, सेरेब्रल पाल्सी, स्वमग्न, बहुविकलांग, कुष्ठरोग निवारित, शारिरीक वाढ खुंटणे, बौध्दिक अक्षम (मतिमंद), स्नायूंची विकृती, मज्जासंस्थेचा तीव्र आजार, मल्टीपल स्क्लेरोसिस (Multiple Sclerosis), थैलस्सेमिया, हिमोफेलिया, सिकल सेल आजार, अॅसिड अॅटॅक व्हिक्टिम, पार्किनसन्स आजार इ. २१ प्रवर्गातील व इतर आव्हानात्मक परिस्थितीत आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना नजिकच्या शाळेत शिक्षण देताना सुयोग्य अध्ययन शैलीचा उपयोग करतांना गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. म्हणून वेगळ्या अध्ययन शैलीच्या गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांचे इतर सामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने प्रत्येक घटकामध्ये मूल्यमापन न करता त्यांच्या अध्ययन शैलीनुसार ज्ञानाच्या, भाषेच्या मूल्यमापनाच्या पध्दती विकसित असणे अपेक्षित आहे.


संदर्मित शासन निर्णयाव्दारे विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विविध बहु अध्ययनशैलीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण विद्यार्थ्यांना असलेल्या परिक्षा योजनेप्रमाणे मूल्यांकन न करता परीक्षा पध्दतीमध्ये अनुकूलन (Adaptive Approach) करुन देणे आवश्यक आहे. परिणामी Facilitator / शिक्षक यांनी अध्यापन केलेल्या व उपयोगात आणलेल्या मूल्यांकन पध्दतीमध्ये विद्यांर्थ्यांमध्ये प्रगती चांगली दिसून येईल व शिक्षकांमध्ये आनंद, विश्वास व स्वयंप्रेरणा दिसून येईल. या विद्यार्थ्यांना नवनवीन अभ्यास क्षेत्रांची ओळख होणे, बुच्दी कौशल्य, उद्यमशीलता या सर्व बाबींचा म्हणजेच सर्वकष अभ्यास होणे आवश्यक आहे.


याकरिता या विशेष शैक्षणिक गरजा असणाऱ्या (दिव्यांग) बहु अध्ययन शैलीच्या विद्यार्थ्यांना नजिकच्या शाळेत सर्व मुलांबरोबर एकत्रित शिक्षण घेता यावे, याकरिता प्राथमिक स्तरावर इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी करिता सर्व शिक्षा अभियान (दिव्यांग) समावेशित शिक्षण (ED Inclusive Education for Disabled) व इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (दिव्यांग) समावेशित शिक्षण माध्यमिक स्तर IEDSS-Education for Disabled at Secondary State) सुरु करण्यात आलेले होते. या सर्वाचा विचार आता एकत्रितपणे समग्र शिक्षा अभियानातंर्गत पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत समतात्मक दृष्टीकोनातून गुणात्मक समानता साध्य करण्यासाठी होत आहे. या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व परीक्षा पध्दती अध्ययन शैलीनुसार (Learning Style) असणे आवश्यक आहे, यासाठी विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व परीक्षा पध्दतीमध्ये समतात्मक दृष्टीकोनातून अध्ययन शैलीनुसार अनुकूलन Adaptation करुन समाजातील उत्पादनशील घटक म्हणून समान पातळीवर आणणे हा देखील यामागील मुख्य उद्देश आहे.


विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन व मूल्यमापनामध्ये गरजेनुसार अध्ययनार्थी दृष्टीकोनातून अध्ययनशैलीनुसार अध्यापन व अनुकूलित (Adaptive) मूल्यांकन पध्दतीचा उपयोग करण्यासंदर्भात शासन स्तरावरुन समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार इयत्ता १ली ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्ययन शैलीनुसार सुलभ अध्ययन व अध्यापन व अनुकूलित (Adaptive) मूल्यांकन पध्दतीचा व शैक्षणिक सवलतींचा उपयोग करण्यात यावा ही बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार खालील निर्णय घेण्यात येत्त आहे. 



संपूर्ण gr download link 


https://drive.google.com/file/d/1zItuxt8iPTJnKrrtYmg2ypbc86DYDiE_/view?usp=drivesdk


शासकीय दस्तऐवजाांवर आईचे नाव बांधनकारक करण्याबाबत. .



विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, जन्म व मृत्यू नोंदी दाखला, सेवापुस्तक, विविध परीक्षांची आवेदन पत्रे इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव वेगळ्या स्तंभामध्ये दर्शविण्यात येते. तथापि, महिलांना पुरुषांबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी तसेच समाजामध्ये महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिला यांची संतती (अनौरस संतती) यांना देखील समाजामध्ये ताठ मानाने जगण्यासाठी शासकीय दस्तऐवजांमध्ये उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


खालील शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवित्ता उमेदवाराचे नांव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय दिनांक ०१ मे, २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहील:-


१. जन्म दाखला


२. शाळा प्रवेश आवेदनपत्र


३. सर्व शैक्षणिक कागदपत्रे


४. जमिनीचा सातबारा, प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे


५. शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक


शासन निर्णय क्रमांका संकीर्ण २०२३/प्र-कार्या/२५८.क्र.२


६. सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सैलरी स्लीपमध्ये (वेतन चिठ्ठी)


७. शिधावाटप पत्रिका (रेशनकार्ड)


८. मृत्यु दाखला


तथापि, सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म-मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करुन नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचारविनिमय करावा, तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म/मृत्यु नोंदवहीत बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडीलाचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंद करण्यात यावी.


२. विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पादतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी. तसेच श्रीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यात येत आहे.


अनाथ व तत्सम अपवादात्मक प्रकरणी मुलांच्या जन्म/मृत्यु दाखल्यात नोंद घेण्याबाबत सुट देण्यात येत आहे.


३. याबाबत नमूद करण्यात येते की, खालील शासन निर्णयात आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभात नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


अ) शासन निर्णय, महिला व बाल कल्याण विभाग, दि.३०.११.१९९९ अन्वये, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, जन्म-मृत्यु नोंदणी, शिधा वाटप पत्रिका, रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी, लोकसेवा आयोगाच्या परीक्षा इत्यादी बाबतच्या आवेदनपत्रावर तसेच अन्य शासकीय/निमशासकीय कागदपत्रांवर/अभिलेखावर वडीलांच्या नावाचा स्तंभ असतो आणि त्यात संबंधितांच्या वडीलांच्या नावाच्या स्तंभाबरोबरच संबंधितांच्या आईच्या नावाचाही स्तंभ ठेवण्यात यावा आणि त्यामध्ये संबंधितांच्या वडीलांच्या नावाबरोबरच त्याच्या आईचेही नाव नमूद करण्याचे बंधनकारक करण्यात येत आहे.


आ) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, दि.०५.०२.२००० अन्वये, प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव दाखल करताना दाखलखारीज नोंदवहीमध्ये/जनरल रजिस्टरमध्ये तक्ता-ब मध्ये विद्यार्थ्याचे पूर्ण लिहिल्यानंतर त्या शेजारी एका रकान्यात विद्यार्थ्याच्या आईच्या नावाची नोंद करण्या यावी. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांला शाळा सोडल्याचा दाखला देताना त्यामध्ये विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव लिहिल्यानंतर त्याखाली विद्यार्थ्यांच्या आईचे नाव लिहिण्यात यावे, 



इ) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, दि. २४.०२.२०१० अन्वये, घटस्फोटीत पती, पत्नी वा आई वडीलांचा घटस्फोट झाला असेल, अशा प्रकरणी त्यांना असणाऱ्या अपत्यांची कस्टडी न्यायालयाने त्यांच्या आईकडे दिली असेल, अशा घटस्फोटीत आईने/महिलेने अपत्यांच्या नावापुढे त्यांच्या वडीलांच्या नावाऐवजी त्यांच्या आईचे नाव लावावे, अशी विनंती केल्यास विहित करण्यात आलेल्या अटींच्या अधीन राहून नावात बदल करण्याची कार्यवाही करण्यात यावी.


शासन निर्णय क्रमांका संकीर्ण २०२३/प्र-कार्या/२५८.क्र.२


वरील शासन निर्णयात आईच्या नावाचा उल्लेख वेगळ्या स्तंभात दर्शविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, आता सदर शासन निर्णयात सुधारणा करुन मा. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव तद्नंतर आडनाव अशा स्वरुपात लावणे बंधनकारक करण्याच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी.


४. मा. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार ज्या विभागाच्या कागदपत्रांच्या नमुन्यात बदल करणे आवश्यक आहे त्या प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिनियम/नियम इत्यादी मध्ये सुधारणा करण्यासाठी विहित कार्यपध्दतीचा अवलंब करावा व तद्नंतर आवश्यक ती प्रक्रीया करण्यात यावी.


५ सदर शासन निर्णय मा. मंत्रिमंडळाने दि.११.०३.२०२४ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.


६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०३१४१९४२५३७२३० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


Gr download link  

https://drive.google.com/file/d/1z1b-ODTsTj7FkzvGI890L42zr9bMNjcO/view?usp=drivesdk




माझा महाराष्ट्र - maharashtra

 



माझा महाराष्ट्र - एक झलक*


★ महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६०

★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई 

★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर 

★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६ 

★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५

★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६

★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २७

★ महाराष्ट्रातील नगरपालिका : २२६

★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : ७

★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३

★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४

★ महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८

★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५

★ महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३

★ स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १०००

★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१%

★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग

★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१% )

★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार (६४.४% )

★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे 

★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग

★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहमदनगर 

★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर 

★ जास्त लोकसंख्येचा जिल्हा : पूणे

★ जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा : मुंबई शहर

★ कमी लोकसंख्येचा जिल्हा : सिंधुदुर्ग 

★ भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण : ९.२८%

★ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा

★ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा

★ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत 

★ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु

★ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती : मराठी

★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी. / ५,४०० फुट)

★ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी : गोदावरी (पूर्ण लांबी : १,४६५ किमी)

★ महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी (४५० मैल)

★ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : मा.एकनाथ शिंदे

★ महाराष्ट्राचे राज्यपाल : श्री रमेश बैस

★ महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३रा 

★ महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २रा 

★ महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)

★ महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने क्रमांक : ६वा (८२.९%)

★ महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला

★ महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा : सोलापूर 

★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी : मुंबई

★ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह/सभागृह : षन्मुखानंद सभागृह, मुंबई

★ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला जिल्हा : रत्नागिरी

★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा : चंद्रपूर

★ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस : शताब्दी एक्सप्रेस (पुणे मुंबई)

★ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे :महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)

★ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा : अहमदनगर

★ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा : अहमदनगर

★ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी : गोदावरी

★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर (चंद्रपूर)

★ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा : रेगूर मृदा

★ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण

★ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल : श्री. प्रकाश

★ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका : मुंबई

★ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७)

★ महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र : मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)

★ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण : गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)

★ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)

★ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)

★ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर

★ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)

★ महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि.अहमदनगर (१९६८)

★ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि.अहमदनगर : (१९५०)

★ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी

★ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)

★ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)

★ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपुर

★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक : दर्पण (१८३२)

★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक : दिग्दर्शन (१८४०)

★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र : ज्ञानप्रकाश

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.