blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद


क्रीडा दिन

आज २९ ऑगस्ट हा हॉकीचे जादूगार  मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस. त्यामुळेच देशातील सर्व खेळाडूंना प्रेरणास्थान ठरणाऱ्या या महान हॉकीपटूचा जन्म दिवस आपल्या देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

मेजर ध्यानचंद यांची माहिती.

जन्म. २९ ऑगस्ट १९०५ अलहाबाद येथे.

मेजर ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप होता. भारतीय हॉकीतील नव्हे तर हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. हॉकीतील जादूगार अशीच त्यांची जगभरात ओळख आहे. ड्रिबिलगमधील त्यांचे कर्तृत्व एवढे भन्नाट होते की, चेंडू लोहचुंबकाप्रमाणे त्यांच्या स्टिककडे आकर्षित होतो असाच साऱ्यांचा समज व्हायचा. ध्यानसिंग सोमेश्वरसिंह बैस हे त्यांचे पूर्ण नाव. मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यानसिंग असे होते. मात्र, ते नेहमी रात्री चंद्र प्रकाशात सराव करत असत त्यामुळे कालांतराने त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यान सिंग यांच्या नावापुढे ‘चंद’ हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले. मेजर ध्यानचंद यांचे शिक्षण फक्त ६ वी पर्यंतच.  खरंतर सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरूवात केली होती. त्याआधी त्यांना हॉकीचा अनुभव नव्हता. त्यानंतर ध्यानचंद यांचा भाऊ रूप सिंग यानेही आपल्या ध्यानचंद यांच्या पावलावर पाऊल ठेवत हॉकीमध्ये आवड निर्माण केली. हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांना सामोरे जात असतानाही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता. ध्यानचंद यांच्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. १९२६ च्या न्युझीलंड दौ-यात एकूण २१ सामने खेळणा-या भारतीय संघातर्फे १९२ गोल झाले त्यातील १०० गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते. १९२८ साली झालेल्या ऑल्मपिक  हॉकीत भारत  अजिंक्य ठरला. स्पर्धेच्या पाच सामन्यात भारतावर एकही गोल झाला नव्हता. उलट भारताने २९ गोल केले होते. या स्पर्धेचे हिरो होते ध्यानचंद. 



१९२८ च्या ऑमस्टरडॅम ऑलिम्पिक  स्पर्धेत अंतिम सामन्यात नॅदरलेंड विरुद्ध ३-० अशा जिंकलेल्या सामन्यात, ३ पैकी दोन गोल ध्यानचंद होते. १९३२ च्या लॉस एन्जलीस ऑलिम्पिक  स्पर्धेत अमेरिकेस तर २३ - १ अशा फरकाने भारताने हरवले. हा उच्चांक २००३ पर्यंत अबाधित होता. त्यातील ध्यानचंदने ८ गोल केलेले होते. हंगेरी विरुद्ध ४-०,  अमेरिका ७-०,  जपान ९-० असा प्रवास करत फ्रान्स विरुद्ध १०-० असा जिंकला तर जर्मनी विरुद्ध ८-१ असा जिंकला. त्यांनी भारताला १९२८, १९३२ व १९३६ मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक गोल केले. १९३६ मधील भारत-जर्मनी यांच्यातील ऑलिम्पिकच्या अंतिम लढतीत ध्यानचंद यांच्या याच नजाकतीने अगदी जर्मनीचा हुकूमशहा  हिटलर यांनाही वेड लावले होते. त्यांच्या या असामान्य कौशल्याने भारावलेल्या हिटलर यांनी त्यांना जर्मन नागरिकत्व देण्याची तसेच इंग्लिश इंडियन आर्मीत मेजरपद व कर्नल पदापर्यंत बढती देण्याचीही ‘ऑफर’ दिली होती, पण देशप्रेमी व स्वाभिमानी ध्यानचंद यांनी ती नम्रपणे नाकारली होती. मात्र, ध्यानचंद यांनी तो फेटाळून लावला होता. ध्यानचंद आपला शेवटचा आंतराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळले. भारत सरकारने ध्यानचंद यांना १९५६ साली पद्मभूषण देऊन गौरवले होते. मेजर ध्यानचंद यांचे ३ डिसेंबर १९७९  रोजी निधन झाले. हॉकी विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या या हॉकीच्या जादूगाराला क्रीडा दिनानिमित्त सलाम.

शिक्षक दिन भाषण 4

 शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक.


5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. प्रथमतः आई या गुरूला नंतर माझे वडील या गुरूंना आणि ज्यांनी माझे भविष्य घडविले त्या तमाम गुरुवर्याना नमन करून मी भाषणास सुरुवात करतो.


चिखलातला जन्मही

सुंदर सार्थकी लावावा.!

निसर्गासारखा शिक्षक

प्रत्येकाला मिळावा.!!


भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन‘ म्हणून साजरा करतात.


शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते.


आपल्या गुरु, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. असं म्हणतात की, एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण देशाचे भविष्य आहे.


कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यांना आकार देऊन सुंदर मूर्ती घडवतो. त्याचप्रमाणे शिक्षकही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला सुरेख आकार देऊन संस्कारक्षम भावी पिढी घडविण्याचे महान कार्य करत असतात.


कोरोना काळात शाळा बंद होत्या. तेव्हा कळले शिक्षकांचे महत्त्व. शाळेचे महत्त्व. ऑनलाईन शिक्षण शिक्षकांची कमतरता भरून काढू शकत नाही.


शिक्षक दिन साजरा केलाच पाहिजे. कारण विद्यार्थ्याला अज्ञानातून ज्ञानाकडे आणि ज्ञानातून विज्ञानाकडे घेऊन जात उद्याचे भविष्य घडविण्याचे महान कार्य शिक्षकच करत असतात.


अवजारे लोहार बनतो,

दागिने सोनार !

मातीपासून मडके बनवितो,

मेहनत करून कुंभार !!


पण अज्ञानावर घाव घालून विद्यार्थ्यांना स्वयंप्रकाशित करणारे ते फक्त शिक्षकच असतात. माझ्या जीवनातील सर्व गुरुवर्यांना आज शिक्षक दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम !!


🙏🙏🙏

शिक्षक दिन भाषण 3

 छडी लागे छम छम !

विद्या येई घम घम !!


असे म्हणत चुकी केल्यावर हातावर छडी मारून उठवणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक.


आदरणीय व्यासपीठ, माननीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज 5 सप्टेंबर “डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन” यांचा वाढदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो.

पुरातन काळापासूनच गुरूंनी शिष्याचे नाते सलोख्याचे आणि प्रेम भावाचे म्हणून गौरवले जाते. गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे.


भारतात प्राचीन काळापासूनच गुरु शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.


म्हणूनच म्हटले आहे –


“गुरु विना कोण दाखवील वाट”


राष्ट्र निर्मितीचा मूळ पाया घालणारी एकच व्यक्ती म्हणजे शिक्षक होय. जीवन जगताना कितीतरी खडतर प्रसंग येतात. त्यातून तावून, सुलाखून निघण्याचे सामर्थ्य बालपणीच शिक्षकांनी शिकवलेले संचितच पुरविते, बळ देते.


शाळेत शिकत असताना विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्या स्पर्धांचे परीक्षण गुरूच्या हाताखालूनच केले गेल्याने तो आत्मविश्वास नोकरीसाठी मुलाखत द्यायला जाताना किंवा संकटाच्या वेळी कामास येतो. शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त विषयाचे ज्ञान देत नाहीत तर, जीवनात जगण्याचे बाळकडू पाजतात.


म्हणून फक्त आजच नाही, तर रोजच त्यांना सन्मान देऊया. 🙏🙏🙏

शिक्षक दिन भाषण 2

 आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक, पूज्य गुरुजनवर्ग, उपस्थित असलेले माझे सर्व मित्र-मैत्रिणींनो आज 5 सप्टेंबर आयुष्याला आधार, आकार आणि ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचा दिवस.


शि – म्हणजे शिलवान

क्ष – म्हणजे क्षमाक्षिल

क – म्हणजे कर्तव्यदक्ष 

अशा सर्व शिक्षकांना वंदन करून शिक्षक दिनानिमित्त मी दोन शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती. 

शिक्षक आपल्याला योग्य मार्ग दाखवून योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात. दरवर्षी 05 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिक्षकां प्रति सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.


शिक्षकांचे प्रत्येकाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असते. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान दार्शनिक व्यक्तिमत्व आणि शिक्षक होते. या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. शिक्षक हे सन्मानाचे हक्कदार आहेत. कारण शिक्षकच चांगले चारित्र्य निर्माण करू शकतात.


आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्व घडण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभे राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचे महत्त्व समजावण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.


शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते. कारण शिक्षकांमुळे भविष्यातील डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचावणारी सामर्थ्यवान पिढी तयार होते.


दिया ज्ञान का भंडार हमे,

किया भविष्य के लिए तयार हमे,

हे आभारी उन गुरुओ के हम,

जिसने किया कृतज्ञ अपार हमे.!


शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमूल्यन केले जात असल्याचे चित्र समाजात दिसत आहे. गुरु-शिष्य संबंधातील पवित्र भावना लोप पावत आहे.


या संबंधातील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी, डॉक्टर राधाकृष्णन यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरीती व आदर असे पैलू पाडले जात असतात.


त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. चला तर मग शिक्षक दिनी त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करूया.


मेरे जैसे शून्य को,

शून्य का ज्ञान बताया !

हर अंक के साथ शून्य,

जोडणे का महत्व बताया !!


सबके सामने कर सकु बात,

यह विश्वास मुझमे जगाया !

गुरु तेरे उपकार का कैसे चुकाऊ मे मोल,

लाख किमती धन भला,

गुरु है मेरे अनमोल!!


माझ्या जीवनात आलेल्या सर्व शिक्षकांना, गुरूंना वंदन करून मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो 


शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

शिक्षक दिन भाषण 1

  



आज 05 सप्टेंबर हा दिवस आपण ‘शिक्षक दिन‘ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस होय .

ते कुशल वक्ते, थोर विचारवंत, विद्वान, उत्तम लेखक व आदर्श शिक्षक होते. त्यांचे शिक्षणावरील प्रेम आणि विद्वत्तेमुळे भारतात त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.


शिक्षक म्हणजे –

चांगले संस्कार करणारी मूर्ती,

संकट काळात धैर्य देणारी स्फूर्ती!

चारित्र्य पूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार

जादूची छडी म्हणजे जी करते

विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार…!


शिक्षक दिन हा राष्ट्राचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आहे. हा दिवस आपल्या शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.


शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते अतूट असते. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्माता असतो. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतो. त्याप्रमाणे शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत असतात.


शिक्षक दिन सर्व शाळा व महाविद्यालयात उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देतात. या दिवशी मुले शाळेत शिक्षकांची भूमिका निभावतात.


शिक्षक हेच भावी पिढीचे शिल्पकार आहेत. शिक्षण हाच खरा विकासाचा मंत्र आहे. शिक्षक हेच समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. यामध्ये शिक्षकांची भूमिका फार मोलाची आहे. ज्याप्रमाणे माळी झाडांची काटछाट करून त्याला सुंदर बनवतो. त्याचप्रमाणे शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांचे दुर्गुण दूर करून त्यांच्यात सदगुणांचा विकास घडवून आणतात.


आपण सर्वांनी आपल्या शिक्षकांचा नेहमी आदर व सन्मान केला पाहिजे. हीच आपल्या प्रत्येक गुरुला योग्य गुरुदक्षिणा ठरेल.


शिक्षणाच्या ज्योतीतून, अज्ञानाचा अंधार दूर करत, नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना –


शत शत प्रणाम !


ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.