मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

आधार updates करा मोफत......

 केंद्र सरकारने नागरिकांना मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची संधी दिली आहे...

 केवळ सहा दिवस उरले आहेत. पुढील आठवड्याच्या आत त्यांना घरबसल्या आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. आधार कार्डमधील काही माहिती अपडेट करण्यासाठी मोफत संधी देण्यात आली आहे. आता ऑनलाईन आधार कार्ड अपडेटसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. तर आधार केंद्रावर (Aadhaar Centre) जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला कमीत कमी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल.चूक करा दुरुस्त

जर तुम्ही आधार कार्ड मध्ये माहिती देताना अथवा ती भरताना चूक केली असेल तर ही चूक दुरुस्त करता येते. आधार कार्डमध्ये दुरुस्ती करता येते. या सुधारणेसाठी शुल्क आकारण्यात येते. पण केंद्र सरकारने आधार कार्ड अपडेट करण्याची मोफत संधी दिली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांना ही सवलत दिली आहे.

3 महिन्यांची सवलत


UIDAI ने नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन आधार कार्ड अपडेटची सुविधा दिली आहे. ऑनलाईन माध्यमातून आधार कार्डमध्ये ऑनलाईन बदल केल्यास, नागरिकांना छद्दामही लागणार नाही. 15 मार्च ते 14 जून, 2023 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला आधार कार्डमध्ये मोफत बदल करण्याची संधी देण्यात आली आहे. आता ही संधी केवळ 6 दिवसांकरीता आहे. त्यानंतर आधार कार्ड अपडेटसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. UIDAI ने 10 वर्षांपेक्षा अधिक जुन्या आधार कार्ड धारकांना त्यांची माहिती अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.

myAadhaar पोर्टलवर करा अपडेट

UIDAI च्या डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत myAadhaar पोर्टलवर तुम्हाला मोफत आधारकार्ड अपडेट करता येईल. कागदपत्रे अपलोड करता येईल. पोर्टलवर आईडी प्रूफ आणि प्रूफ ऑफ एड्रेस (PoI/PoA) टाकून आधार कार्ड दुरुस्त करता येईल. इतर माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन कागदपत्रे जमा करावी लागतात. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता आणि भाषा बदलवू शकता, त्यात बदल करु शकता. ऑनलाईन दुरुस्तीसाठी, सुधारणेसाठी तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

ही घ्या काळजी


आधार कार्डमध्ये ऑनलाईन बदल करता येतो

नावात बदल करण्यासाठी ओळखपत्राची स्कॅन कॉपी लागेल

जन्मतारीख अपडेट करण्यासाठी जन्मप्रमाणपत्राची स्कॅन कॉपीची आवश्यकता

लिंग बदल करण्यासाठी कागदपत्रे द्यावी लागत नाहीत

ऑनलाइन SSUP पोर्टल, मोबाईल ॲपच्या सहायाने भाषा बदलता येते

सध्या या पोर्टलवर एकूण 13 भाषा आहेत

असे करा आधार कार्ड अपडेट

खालील लिंक वरती क्लिक करा...


https://ssup.uidai.gov.in/ssup/ यावर लॉगिन करा

तुमचा 12 अंकांचा आधारा कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका

ओटीपी पाठविण्याचा पर्याय निवडा, त्यानंतर पुढील प्रक्रिया करा

आधार संबंधीत मोबाईल क्रमांकावर हा ओटीपी येईल

ओटीपी टाकून 'अपडेट आधार ऑनलाइन' हा पर्याय निवडा

'प्रोसीड टू अपडेट आधार' हा पर्याय निवडा, माहिती भरा

🙏🙏🙏

शिक्षण विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख परीक्षा 13 (समाज सुधारक)

शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख परीक्षा 2023 परीक्षेला येणारे हमखास व अचूक प्रश्न अधिक माहितीसाठी खालील 
 www.vkbeducation.com

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.