blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

जागतिक सूर्य नमस्कार दिन

⭐⭐जागतिक सूर्य नमस्कार दिन⭐⭐

 भारतीय तिथी माघ महिन्यातील रथ सप्तमी (शुक्ल सप्तमी); आजच्या दिवशी जागतिक सूर्यनमस्कार दिवस साजरा केला जातो. या दिवशी विविध ठिकाणी सकाळी सूर्योदयाला सूर्य नमस्कार स्पर्धा आयोजित केल्या जातात.

सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १० किंवा १२ योगासने करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो. सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही तथाकथित सूर्य-उपासनाच आहे. हिच्यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम होतोच पण आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते. हा व्यायाम अल्पमोली आणि बहुगुणी आहे असे म्हणतात.

गोपुरम मीनाक्षी मंदिर (मदुराई) ताजमहल - आग्रा अजिंठा लेणी - अजिंठा (औरंगाबाद) दिलवाडा जैन मंदिरे - माऊंट आबू जंतरमंतर - दिल्ली

सूर्यनमस्कारात बारा आसन पवित्र्यांचा समावेश आहे. ते बारा पवित्रे असे आहेत:

1)प्रणामासन किंवा नमस्कारासन,

2)हस्त उत्तासन,

3)पादहस्तासन,

4)अश्वससंचालनासन,

5)पर्वतासन,

6)अष्टांग नमस्कार,

7)भुजंगासन,

8)पर्वतासन,

9)अश्वतसंचालनासन,

10)पादहस्तासन,

11)हस्त उत्तासन,

12) प्रणामासन 

हे नमस्कार घालताना, प्रथम सूर्याचे नाव घ्यायचे ‘ओम मित्राय नमः’ आणि मग वरील बारा पवित्रे घ्यायचे. एक नमस्कार पूर्ण झाल्यावर सूर्याचे दुसरे नाव घेऊन दुसरा सूर्यनमस्कार अशी बारा नावे घेऊन बारा नमस्कार घालायचे. 

ही बारा नावे अशी आहेत: 

1) ओम मित्राय नमः 

2) ओम सूर्याय नमः

3) ओम खगाय नमः

4) ओम हिरण्यगर्भाय नमः

5) ओम आदित्याय नमः

6) ओम अकार्य नमः

7) ओम रवये नमः

8) ओम भानवे नमः

9) ओम पूष्णय नमः

10) ओम मरिचये नमः

11) ओम सवित्रे नमः

12) ओम भास्कराय नमः  

गोपुरम मीनाक्षी मंदिर (मदुराई) ताजमहल - आग्रा अजिंठा लेणी - अजिंठा (औरंगाबाद) दिलवाडा जैन मंदिरे - माऊंट आबू जंतरमंतर - दिल्ली

साष्टांग नमस्कार श्लोक - उरसा शिरसा द्रष्ट्या वचसा मनसा तथा| पदाभ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणामः अष्टांग उच्यते ||

अर्थ - दृष्टी, मन आणि वाणी संयमीत करुन (एक) छाती, (एक) मस्तक, (दोन) पाय,  (दोन) हात, (दोन) गुडघे, या आठांनी जो नमस्कार करायचा त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात.{१}

मूळ संपादन करा

हिंदू धर्मात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्य हे शैव पंथीय समाजात शंकराचे तर वैष्णव पंथीय समाजात विष्णूचे एक अंग मानले जाते. वेदांमध्ये व पौराणिक ग्रंथांमध्ये सूर्याची उपासना करण्याबद्दल अनेक संदर्भ सापडतात. उगवत्या व मावळत्या सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्कारांचे प्रथम उद्दिष्ट आहे.

आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने।

जन्मान्तरसहस्रेषु दारिद्ऱ्यं नोपजायते ।।

जे साधक दररोज सूर्य नमस्कार करतील, त्यांना सहस्र जन्म दारिद्ऱ्य येत नाही (काहीही कमी पडत नाही)

सूर्य नमस्कार हा सर्वागीण व्यायाम आहे. सर्व यौगिक अभ्यासासाठी सूर्योदयाची वेळ सर्वोत्तम मानली गेली आहे. त्याचप्रमाणे सूर्य नमस्कारसुद्धा सूर्योदयाच्या समयी घालणे हितकारक आहे. उघड्यावर हवेशीर जागेवर रिकाम्या पोटी सूर्य नमस्कार घालावेत. मन शांत आणि प्रसन्न असल्यावर सर्व योगाभ्यासाचा आपणावर विशेष परिणाम होतो, असे म्हणतात. 

*सूर्यनमस्कारांतील आसने मंत्र *

प्रत्येक सूर्यनमस्काराची सुरुवात करताना प्रणामासनात खालील मंत्र म्हटले जातात. त्या त्या मंत्राचा शरीरातील चक्राशी संबंध आहे, असे म्हणतात.

क्र. मंत्र चक्र

१ ॐ मित्राय नमः अनाहत चक्र

2 ॐ रवये नमः विशुद्धी चक्र

३ ॐ सूर्याय नमः स्वाधिष्ठान चक्र

४ ॐ भानवे नमः आज्ञा चक्र

५ ॐ खगाय नमः विशुद्धी चक्र

६ ॐ पूष्णे नमः मणिपूर चक्र

७ ॐ हिरण्यगर्भाय नमः स्वाधिष्ठान चक्र

८ ॐ मरीचये नमः विशुद्धी चक्र

९ ॐ आदित्याय नमः आज्ञा चक्र

१० ॐ सवित्रे नमः स्वाधिष्ठान चक्र

११ ॐ अर्काय नमः विशुद्धी चक्र

१२ ॐ भास्कराय नमः अनाहत चक्र

१३ ॐ श्री सवित्रू सुर्यनारायणाय नमः 

सूर्यनामांचा क्रम (सिक्वेन्स) लक्षात ठेवण्यासाठी खालिल श्लोकाचा काही जण उपयोग करतात 

|| मित्र रवि सूर्य भानू खग पूष्ण हिरण्यगर्भ| आदित्य च मरिच सवित्रे अर्क भास्कर नमो नमः||


मित्र= जगन्मित्र , रवी= सर्वाना पूजनीय, सूर्य-प्रवर्तक,संचालक, भानू=तेज देणारा, खग= अकाशातून हिंडणारा, पूषा-पोषण करणारा, हिरण्यगर्भ=पोटात तेज असणारा, मरीच=रोगनाशक, आदित्य= सर्वाकर्षक, सविता= सर्व उत्पादक, अर्क= आदरणीय, भास्कर= प्रकाशमान असे याचे अर्थ आहेत.{१}

सूर्यनमस्कार व श्वासोच्छवास

सूर्यनमस्कारांत वापरल्या जाणाऱ्या बऱ्याचशा आसनांचा ऐतिहासिक ग्रंथांत उल्लेख आढळतो. साष्टांग नमस्कार हे सूर्यनमस्कारातील एक आसन पुरातनकाळापासून सूर्याला प्रणाम करण्याकरिता वापरले गेले आहे. धेरंड संहितेमध्ये भुजंगासन हे ३२ महत्त्वाच्या आसनांमध्ये गणले गेले आहे. अधोमुक्त श्वानासनाचे वर्णन मल्लपुराणात केले गेले आहे.

सूर्यनमस्कारात आरोग्य, दीर्घायुष्य, कार्यक्षमता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचे असते. या आसनामुळे आयुष्य, बल आणि बुद्धिचा विकास होतो. मस्तक, मान, हात, पाय, छाती, पोट, कंबरेचे स्नायू, मेरुदंड, पायाची बोटे, गुढगे, सर्व सांधे यांना व्यायाम घडतो. तसेच पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेला मेद, ओटीपोटातील चरबी, थायरॉईडसारखे विकार, लहान मुलांचे फिरलेले हातपाय व हाडांचे काही दोष, गंडमाळा, घशातील विकार नाहीसे होतात. क्षयापासून संरक्षण मिळते, मनोबलाचा विकास होतो. शरीरात शुद्ध रक्ताचा सारख्या प्रमाणात संचार होतो.  

सूर्यनमस्कार करा तंदुरुस्त रहा धन्यवाद 🙏🙏🙏🙏

स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट 17

टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा....

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.