blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट 10

टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा...🙏🙏

महाराष्ट्र केसरी 2023 शिवराज राक्षे

पैलवान शिवराज राक्षे यांनी महाराष्ट्र केसरी 2023 चे विजेचे पद पटकावले आहे . आणि सोलापूरचा महिंद्रा गायकवाड उप महाराष्ट्र केसरी खूप खूप शुभेच्छा अभिनंदन  💐💐🌹🌹💐💐🌹🌹💐💐🌹🌹



यंदाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी ठरला आहे. 

नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने ‘महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) याला काही मिनिटातंच थेट चितपट करत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या विजयासह नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे हा 55 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे 

पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्कृती प्रतिष्ठानचेवतीने संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 45 संघ आणि 900 हून अधिक पैलवान या स्पर्धेत उतरले होते. या स्पर्धेची सुरुवात 1961साली झाली होती. त्यानंतर आतापर्यंत अनेक मल्लांनी या महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आहे.


आतापर्यंतचे महाराष्ट्र केसरी जिंकलेले पैलवान

1) पैलवान दिनकर दहय़ारी (औरंगाबाद, 1961)

2) पैलवान भगवान मोरे (धुळे, 1962)

3) पैलवान गणपतराव खेडकर (अमरावती, 1964)

4) पैलवान गणपतराव खेडकर (नाशिक, 1965)

5) पैलवान दीनानाथ सिंग (मुंबई, 1966)

6) पैलवान चंबा मुतनाळ (खामगाव, 1976)

7) पैलवान चंबा मुतनाळ (नागपूर, 1968)

8) पैलवान हरिश्चंद्र बिराजदार (लातूर, 1969)

9) पैलवान दादू चौगुले (पुणे, 1070)

10) पैलवान दादू चौगुले (अलिबाग, 1071)

11) पैलवान लक्ष्मण वडार (कोल्हापूर, 1972)

12) पैलवान लक्ष्मण वडार (अकोला, 1973)

13) पैलवान युवराज पाटील (ठाणे, 1974)

14) पैलवान रघुनाथ पवार (चंद्रपूर, 1975)

15) पैलवान हिरामण बनकर (अकलूज, 1976)

16) पैलवान आप्पासाहेब कदम (मुंबई, 1978)

17) पैलवान शिवाजीराव पाचपुते (नाशिक, 1979)

18) पैलवान इस्माईल शेख (खोपोली, 1980)

19) पैलवान बापू लोखंडे (नागपूर, 1981)

20) पैलवान संभाजी पाटील (बीड, 1982)

21) पैलवान सरदार खुशहाल (पुणे, 1983)

22) पैलवान नामदेव मोळे (सांगली, 1984)

23) पैलवान विष्णूजी जोशीलकर (पिंपरी चिंचवड, 1985)

24) पैलवान गुलाब बर्डे (सोलापूर, 1986)

25) पैलवान तानाजी बनकर (नागपूर, 1987)

26) पैलवान रावसाहेब मगर (सोलापूर, 1988)

27) पैलवान आप्पालाल शेख (सोलापूर, 1992)

28) पैलवान उदयराज जाधव (पुणे, 1993)

29) पैलवान संजय पाटील (अकोला, 1994-95)

30) पैलवान शिवाजी केकाण (नाशिक, 1995-96)

31) पैलवान अशोक शिर्के (वर्धा, 1996-97)

32) पैलवान गोरखनाथ सरक (नागपूर,1997-98)

33) पैलवान धनाजी फडतरे (पुणे, 1998-99)

34) पैलवान विनोद चौगुले (खामगाव, 1999-2000)

35) पैलवान राहुल काळभोर (नांदेड, 2001)

36) पैलवान मुन्नालाल शेख (जालना, 2001-02)

37) पैलवान दत्तात्रय गायकवाड (यवतमाळ, 2002-03)

38) पैलवान चंद्रहास निमगिरे (वाशी, 2003-04)

39) पैलवान सईद चाउस (इंदापूर, 2004-05)

40) पैलवान अमोल बुचडे (बारामती, 2005-06)

41) पैलवान चंद्रहार पाटील (औरंगाबाद, 2007)

42) पैलवान चंद्रहार पाटील (सांगली, 2008)

43) पैलवान विकी बनकर (सांगवी पिंपरी-चिंचवड, 2009)

44) पैलवान समाधान घोडके (रोहा, 2010)

45) पैलवान नरसिंग यादव (अकलूज – 2011)

46) पैलवान नरसिंग यादव (गोंदिया – 2012)

47) पैलवान नरसिंग यादव (भोसरी – 2013)

48) पैलवान विजय चौधरी (अहमदनगर-2014)

49) पैलवान विजय चौधरी (नागपूर-2015)

50) पैलवान विजय चौधरी (वारजे-2016)

51) पैलवान अभिजीत कटके (भूगाव-2017)

52) पैलवान बाला रफीक शेख (जालना-2017)

53) पैलवान हर्षद सदगीर (म्हाळुंगे-बालेवाडी-2019)

54) पैलवान पृथ्वीराज पाटील (सातारा-2021-22)

55) पैलवान शिवराज राक्षे (पुणे 2023) 


🙏🙏🙏



स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट 9

टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा..🙏🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.