blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

आम दार माणूस गणपतराव देशमुख

    इतका साधा, इतका सरळ,  इतका आक्रमक... पुन्हा 

होणे नाही!


मधुकर भावे


९५  वर्षांचे गणपतराव गेले. एकाच मतदारसंघात ११ वेळा विधानसभेत निवडून येणारा बहाद्दर नेता गेला.  गेल्या ७0 वर्षांच्या राजकारणात उंच पुरे गणपतराव यांचा वेष बदलला नाही, पायातली चप्पल कायमच राहीली. बुुटाने जागा कधी घेतली नाही. आमदार असोत, नसोत, मंत्री असोत, नसोत, त्यांच्या वागण्या, बोलण्यात, राहण्यात  ७0 वर्षे फरक नाही. १९६२ ला आमदार म्हणून ते विधानसभेत आले. ६0 वर्षे पत्रकारिता केली. रोजच्या पत्रकारितेतून काहीसा दूर झालो. तरी गणपतराव विधानसभेत होतेच. माझ्या माहितीप्रमाणे उध्दवराव पाटील, एन.डी.पाटील, गणपतराव देशमुख, केशवराव धोंडगे, बापू लाड, दि.बा.पाटील, दत्ता पाटील, ही महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणाची खरी प्रतिके. ही माणसे ना कोणासमोर वाकली, ना कोणी त्यांना मोडू शकले किंवा तडजोडीत मोहात पाडू शकले. जांबुवंतराव धोटे ही या यादीत आहेत अशी पिळदार माणसं आता मिळायची नाहीत. केशवराव धोंडगे आज १0१ वर्षांचे कंधारमध्ये अजून गर्जत आहेत. ९६ वर्षांचे एन.डी.पाटील  भीष्माचार्य आहेत,  अशी माणसं पुन्हा  होणार नाहीत.  गणपतराव यात आणखी वेगळे कारण उध्दवराव, एन.डी, केशवराव यांना महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या जातीचा मोठा फायदा होता. गणपतराव ‘मा.ध.व’ मधील ध. यापैकी कोणाही नेत्यांना राजकारण करताना ना कधी जात पाहिली, यापैकी कोणालाही पैशाचा, सत्तेचा कसलाच मोह नव्हता. नाही म्हणायला एन.डी आणि गणपतराव पु.लो.द सरकारात मंत्री झाले. गणपतराव मंत्रालयाच्य समोरच्या छोट्या बी-४ बंगल्यात रहायचे. मंत्रालयात येताना चालत यायचे आणि चालतच घरी जायचे. एकदा त्यांना सहज विचारल ‘गणपतराव... आता छोटा  का होईना छान बंगला आहे, परिवाराला आणि लेकरांना इथे का नाही आणत?’  गणपतराव म्हणाले, ‘मंत्रीपद कायम थोडच आहे... मुंबईचा खर्च परवडत नाही, या सवयी आम्हाला महाग वाटतात. पत्नीला घर चालवायला महिना ५00 रुपये देतो....’

 मी ऐकत राहीलो. ही गोष्ट १९७८ ची. ४३ वर्षे झाली.  त्यावेळी लोकमतमध्ये लेख लिहीला.  शिर्षक होते... ‘पत्नीला ५00 रुपयात घर चालवायला सांगणारा मंत्री’ दोघांच्या फोटोसह लेख छापून आला. काही महिन्यांनी गणपतरावांबरोबर सांगोल्याच्या सूतगिरणीच्या कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रम आटोपल्यावर गणपतरावांच्या घरी जेवायला गेलो. ज्वारीची भाकरी, झुणका, भरीत, ठेचा वहिनींनी छान बेत केला. गणपतरावांनी ओळख करुन दिली.... ‘रतनबाई, आपल्यावर लेख लिहीणारे हेच ते पत्रकार...’  वहिनीसाहेब  ताडकन म्हणाल्या...‘खोट का लिहीता हो...’ ‘मी म्हटल काय खोट लिहील, गणपतरावांनी सांगितल ते लिहील....’ गणपतरावांकडे  फणकाºयाने बघून त्या म्हणाल्या...  ‘कधी ५00 रुपये पाठवले.. हो.. ४00 रुपये पाठवायचे...’ असे हे गणपतराव.

 आज गणपतराव गेल्यावर संसदीय कारकिर्दीतला त्यांचा तो शेतकरी आणि गरीबांच्या प्रश्नावरचा संताप आणि आवेश असा डोळ्यसमोर येतोय...  ४0 वर्षे झाली. इस्लामपूरच्या मामलेदार कचेरीवर शेतकºयांचा  प्रचंड मोर्चा निघाला.  शेतीमालाला भाव मिळावा यासाठी, महागाई कमी करावी यासाठी... एन.डी. गणपतराव नेतृत्व करीत होते.  पोलिसांनी गोळीबार केला. एन.डी.चा पुतण्या आणि चार तरुण जागीच ठार झाले. एन.डी आणि गणपतरावांनी मोर्चा थांबवला नाही. 

 १३ मार्च १९६६. 

मुंबईच्या सचिवालयाला एक लाख बैलगाड्यांचा घेराव घातला गेला.  आज कोणी याची कल्पना करु शकेल का? उध्दवराव, एन.डी.पाटील, गणपतराव, त्यावेळच्या शीवपासून (सायन) बैलगाडी चालवत सचिवालयाला घेराव घालण्यापर्यंत आले. गृहमंत्री होते बाळासाहेब देसाई. आता जिथे इस्लाम जिमखाना आहे तिथे बाळासाहेबांच्या गाडीसमोर एन.डी. आणि गणपतरावांनी आपल्या बैलगाड्या घातल्या. बाळासाहेबांना अडवले. आतासारखे भाडोत्री सुरक्षारक्षक तेव्हा नव्हते. मंत्र्यांना भीती वाटत नव्हती. बाळसाहेब गाडीतून खाली उतरले. एन.डी., गणपतराव आणि उध्दवराव (हे उध्दवराव म्हणजे फार मोठे नेते उध्दवराव पाटील)  यांंनी नमस्कार करुन बाळासाहेबांना अडवले. बाळासाहेब गाडीतून खाली उतरले. त्यांची मोठी डॉज गाडी होती.... हे नेते म्हणाले ‘आज तुम्हाला मंत्रालयात जावू देणार नाही... ’ बाळासाहेबांनी नमस्काराची परतफेड केली. शांतपणे गाडीत बसून गाडी वळवली. ते मेघदूत बंगल्यावर गेले. एकही मंत्री मंत्रालयात पोहोचू शकला नव्हता. पण खंत अशी आहे की, शे.का.पक्षाचे हे नेते शेतकºयांच्या  ज्या प्रश्नासाठी आयुष्यभर लढले त्यातला प्रत्येक प्रश्न आज जसा न तसा जिथे होता तिथेच आहे. १ मे १९६0 ला संयुक्त महाराष्ट्र झाला. त्यासाठी लढले शेतकरी आणि कामगार.. १0६ हुतात्म्यांमध्ये ७३ हुतात्मे शेतकरी आणि कामगार.. ६१ वर्षांनतर जे लढले, तेच देशोधाडीला लागले. आत्महत्या करण्याची वेळ त्याच शेतकºयावर आली. लढले कोण? धारातीर्थी पडले कोण आणि गब्बर झाले कोण? लढणारे उध्दवराव, गणपतराव दुसºया, तिसºया वर्गातून रेल्वेतून फिरत राहीले. हातात बॅगा घेवून रेल्वेचे जिने चढत राहीले... 

 किती सांगू आणि काय काय सांगू ? महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशा दोन महत्वाच्या योजना म्हणजे कापूस एकाधिकार खरेदी- शेतकºयाला भाव मिळण्याची हमी- आणि दुसरी योजना म्हणजे रोजगार हमी... या दोन्ही योजनांसाठी विधानमंडळाच्या व्यासपीठाव ज्यांनी सर्वस्व पणाला लावले. त्यात गणपतराव देशमुख, दि.बा.पाटील, केशवराव धोंडगे आघाडीवर आहेत. आज त्यांची आठवण कोणालाच नाही. सहज आठवण म्हणून सांगतो. १९७१­-७२ च्या भीषण दुष्काळात वसंतराव नाईक यांच्यापाठोपाठ महाराष्ट्र घुसळून कोणी काढला असेल तर गणपतरावांनी... रोजगार हमीवर पुरुष आणि महिलांना समान मजुरीसाठी गणपतरावांनी विधानमंडळात आकाश पाताळ एक केले होते. शेवटी वसंतराव नाईकसाहेब म्हणाले ‘ हा निर्णय राज्य सरकारला करता येणार नाही, केंद्राला निर्णय करता येईल.. पंतप्रधान इंदिरा गांधी सोलापूरला येत आहेत, तुम्ही त्यांच्यासमोर या मागणीसाठी निदर्शन करा मी परवानगी देतो. शक्य झाल्यास त्यांची मोर्चाशी भेट घडवतो... १९७३ ही गोष्ट.  गणपतराव तेव्हा आमदार नव्हते. ५ हजार महिलांना घेवून त्यांनी निदर्शन केली. वसंतराव नाईक मोेर्चातील ५ नेत्यांना घेवून भेटीसाठी इंदिराजींकडे नेले. इंदिराजींनी मागणी ताबडतोब मान्य केली...

 महाराष्ट्राच्या असंख्य पुरोगामी निर्णयात या सर्व नेत्यांच केवढ मोठं मोल आहे, किती कष्ट आणि श्रम आहेत, यापैकी कोणाही 

नेत्याच्या वाढदिवशी ना कधी अभिनंदन पोस्टर लागलं, ना कधी त्यांना कोणी ‘कार्यसम्राट’ं म्हटल. या सर्व नेत्यांच्यापुढे आजचे नेते किती खुजे, किती सत्तापिपासू आणि प्रसिध्दीसाठी टिमकी वाजवणारे आहेत. 

 उध्दवराव, गणपतराव असे नेते आता पुन्हा होणार आहेत का? शक्य नाही.....

 आणि हो...  सर्वच पक्षाच्या नेत्यांनी हे वाक्य वाचाव....  

उध्दवराव, गणपतराव, एन.डी.पाटील, केशवराव यांनी ६0 वर्षांत त्यांचा पक्ष कधी बदलला नाही.

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.