blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन

 

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन

 यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी आंध्र प्रदेशातील तीरुत्तली या छोट्याशा गावामध्ये झाला. त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. त्यांचे बालपण तीरुत्तली व तिरुपती या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गेले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथील मिशनरी शाळेमध्ये झाले. शालेय शिक्षण घेत असताना त्यांच्या असे लक्षात आले की मिशनरी शाळेमध्ये हिंदू धर्माची निंदा केली जाते. हिंदू धर्मामध्ये अस्पृश्यता, जातीयता, अंधश्रद्धा असे अनेक दोष आहेत. ते प्रारंभी दूर केले पाहिजेत. यासाठी वेद, उपनिषदे व गीता अशा विविध ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. अशी राधाकृष्णन यांची ठाम धारणा बनली आणि त्यांनी अभ्यासास सुरुवातही केली.

मद्रास येथील मिशनरी कॉलेजमध्ये 1905 साली तत्त्वज्ञान विषय घेऊन ते बी.ए. झाले. 1908 साली ते एम.ए. झाले. त्यांनी वेदांतील नीतीशास्त्र विषयावर निबंध लिहिला. प्रेसिडेन्सी विद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करू लागले. वास्तविक पाहता तत्त्वज्ञान अवघड विषय परंतु तो विद्यार्थ्यांना समजावा म्हणून अत्यंत सोप्या भाषेत ते शिकवत होते. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली. हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे यासंबंधी त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले. पाश्चात्यांनीसुद्धा त्यांच्या विचारांचा गौरव केला. आणि त्यांना ती आधुनिक ऋषी म्हणू लागले.डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन १९२६ साली इंग्लंडमध्ये आयोजित केलेल्या जागतिक तत्त्वज्ञान परिषदेला कलकत्ता विद्यापीठातर्फे गेले होते. तेथे त्यांनी आपल्या अमोघवाणीने हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान साऱ्या जगाला समजावून सांगितले.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना तीन वर्षासाठी प्राध्यापक म्हणून बोलावले. तेथे त्यांनी हिंदू जीवन पद्धतीचा दृष्टिकोन (हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ) या विषयावर विविध ठिकाणी व्याख्याने दिली. ही व्याख्याने अतिशय गाजली. अनेक वृत्तपत्रांनी यांचा गौरव केला. त्यामुळे इंग्लंडमध्ये अनेक ठिकाणी त्यांना व्याख्यानाची निमंत्रणे आली. भारतीय तत्त्वज्ञानातील उदात्त विचार तेथील लोकांना अतिशय आवडले .डॉक्टर राधाकृष्णन यांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते .ते शांत चित्ताने आपला विषय श्रोत्यांना समजावून सांगत. 1936 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने स्पाल्डिग प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक केली.1931 साली ते आंध्र विद्यापीठाचे उपकुलगुरू झाले. आंध्र विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टररेट पदवी दिली. नंतर ते बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू झाले. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची जगात ख्याती झाली.

15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर 1952 साली भारताचे पहिले 'उपराष्ट्रपती' म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. 1957 मध्ये पुन्हा एकदा उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. भारतरत्न ही पदवी 1958 मध्ये दिली. 1962 साली भारताचे दुसरे 'राष्ट्रपती' म्हणून त्यांची निवड झाली. राष्ट्र संघामध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काही वर्ष काम केले. ते काही काळ रशियाचे राजदूत होते.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार संपूर्ण जगात केला. हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान व प्रचलित हिंदू धर्मात असणारे दोष स्पष्ट केले. तत्त्वज्ञान विषय शिकविताना अत्यंत सोप्या भाषेचा उपयोग केला. विद्यार्थी प्रिय आणि आदर्श शिक्षक असलेल्या सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिन "शिक्षक दिन" म्हणून साजरा केला जातो. या महान पुरुषाचा मृत्यू 17 एप्रिल 1975 साली झाला.





जन्म 5 सप्टेंबर 1888 ला तीरुत्तनी दक्षिण भारतात तमिळनाडू येथे.
 पूर्ण नाव ~ राधाकृष्णन विरस्वामी सर्वपल्ली
 त्यांचे पूर्वज सर्वपल्ली या गावात राहत असत यावरून सर्वपल्ली हे नावासोबत जोडले गेले.
 1896 ते 1900 पर्यंत तिरुपती येथे विद्यार्जन केले.
1900 ते 1904 पर्यंत वेल्लोर येथे शिक्षण घेतले.
 1909 ला तत्त्वज्ञानात एम.ए. केले.
 1909 ला मद्रास येथील कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक या पदी नियुक्त झाले.
 1921 ला कलकत्ता विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक या पदी नियुक्ती. त्यांनी हिंदू धर्म, तत्त्वज्ञान, वेद ,उपनिषदे इत्यादी हिंदू शास्त्राचा गहण अभ्यास केला होता. आंध्र प्रदेश विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून 1931 ते 1936 कार्य केले.
 1936 ला ऑक्सफर्ड विद्यापीठ इंग्लंड येथे प्राध्यापक पदी नियुक्ती.
बनारस हिंदू विद्यापीठाचे 1939 ते 1948 या दरम्यान कुलगुरूपदी कार्य केले.
 घटना समितीचे सदस्य होते.
1949 ते 1952 भारताचे रशियामध्ये राजदूत.
 1952 ते 1962 भारताचे उपराष्ट्रपती.
1962 ते 1967 भारताचे राष्ट्रपती.

त्यांचा जन्मदिन 5 सप्टेंबर " शिक्षक दिन " म्हणून साजरा करतात.

 " भारतरत्न " हा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना 1954 मध्ये प्रदान केला. लेखन दि हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ, फिलॉसॉपी ऑफ दि उपनिषदज, इंडियन फिलॉसॉफी, अ सोर्स बुक इन इंडियन फिलॉसॉफी, द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर, स्पिरिट ऑफ रिलीजन, सर्च ऑफ ट्रुथ, इ.

 निधन 17 एप्रिल 1975 ला (मद्रास) चेन्नई येथे झाले.    
 🙏🙏

शिक्षकांचे मूल्य

 _शिक्षकांकडे उपद्रवमूल्य नसते आणि तातडीने दिसून येणारे उपयुक्तता मूल्यही नसते. इथेच सारी गडबड झालेली दिसते..._

_एकवेळ लोक इतर सरकारी बाबूंना नमस्कार करतील पण उठून सुटून शिक्षकांना सतत अक्कल शिकवायला कमी करणार नाहीत. त्यांच्या पगारावर बोट ठेवतील. सरकारी शाळा ही कुणालाही कधीही येऊन राग व्यक्त करण्याची चांगली सोय असते. शिक्षक उलट उत्तरं करत नाहीत, सरकारी नोकर आणि सुशिक्षित मनुष्य म्हणून काही मर्यादा पाळाव्या लागतात, त्या ते पाळत राहतात. त्यामुळे शिक्षक हे समाजाला सॉफ्ट टार्गेट वाटतात. शिक्षण आणि बाल मानसशास्त्रा बद्दल काही कळो अथवा ना कळो, त्यावर भाष्य करणं कुणासाठीही फार सोपं असतं. ऐकून घेतल्याने नुकसान शिक्षकांचं होत नाही. पण जेव्हा शिक्षकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं, त्याचा परिणाम समोरच्या विद्यार्थ्यांवर होत असतो हे मात्र नक्की. अहो, नुसता उचलला खडू आणि लावला फळ्याला, म्हणजे झालं शिकवणं असं नसतं...!!_

_मुलांना शिकवता शिकवता वर्षानुवर्षे शिक्षक सुद्धा काही नवनवीन गोष्टी शिकत असतात. शेकडो मुलं हाताखालून जातात तेव्हा मुलांच्या मानसिकतेचे, वर्तनाचे अनेक पैलू समजत जातात. हे शिकताना दरवर्षी शिक्षक नवा झालेला असतो, मागच्या वर्षीचा शिक्षक पुढच्या वर्षी आणखी विचारी आणि समृद्ध झालेला असतो. प्रत्येक मूल वेगळं असतं हे तो जाणतो, त्यामुळे वर्गातल्या सर्व मुलांना एकाच चमच्याने घास भरवण्याचा तो हट्ट करत नाही..._

_बराच काळ एकमेकां सोबत राहून शिक्षक आणि मुलांमध्ये घट्ट नातं निर्माण होत असतं, मुलं शिक्षकाला सरावतात आणि शिक्षकाला मुलं कळायला लागतात..._

_झाडावरच्या सर्व कळ्या एकाचवेळी उमलत नाहीत, तशी सगळी मुलं कितीही नीट शिकवलं तरी एकाचवेळी प्रगत होत नाहीत, हे शिक्षकाला माहिती असतं. एकाच वर्गात राहूनही मुलांच्या शिकण्याच्या वेगवेगळ्या गतीशी कसं जुळवून घ्यायचं हे त्याला बरोबर कळतं..._

_मुलं घरात पालकांशी जितकी बोलत नसतील तितकं वर्गात शिक्षकाशी बोलतात, आपलं सुखदुःख त्याच्याशी वाटून घेतात. मुलांना काय आवडतं, त्यांना कोणत्या गोष्टींनी असुरक्षित वाटतं, त्यांचा कल कोणत्या गोष्टींकडे आहे आणि त्यांना काय पुरवलं म्हणजे ती योग्य रीतीने घडू शकतील याचा चांगला अंदाज असतो शिक्षकाला. हे सगळं काम शाळेत हळूहळू घडत राहतं. विद्यार्थी म्हणजे कंपनी प्रॉडक्ट नसतात, मशीनमध्ये घातले की सगळेच एका छापाचे होऊन बाहेर पडतील. माणसं असतात ती जितीजागती, माणसांना वेगवेगळा स्वभाव असतो, क्षमता असतात आणि परिस्थिती असते. प्रत्येकजण वेगळ्या तऱ्हेने घडतो. या सगळया गोष्टींशी जमवून घेत शिक्षक आपलं काम पुढे नेत असतो. शिक्षकांचं काम हे मानसिक, बौद्धिक स्वरूपाचं असतं, त्यात कंटाळा आणि थकवा या गोष्टी अधूनमधून डोकावणं अगदी साहजिकच आहे. बौद्धिक काम लवकर थकवून टाकतं. मोबाईलला जशी चार्जिंग लागते, तशी बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तींना विश्रांतीची गरज असते. हे अगदी नैसर्गिक आहे..._

_इतर कोणत्याही सरकारी ऑफिसात तुम्ही जाता तेव्हा संबंधित कर्मचारी टेबलवर नसला तरी तुम्ही त्याला अरेरावीची भाषा करत नाही, आपलं काम होईपर्यंत गोड बोललं पाहिजे हे धोरण तुम्ही ठेवता. शिक्षक मात्र जरा पाचदहा मिनिटे इकडेतिकडे झाल्यावर कसं काय आभाळ कोसळतं? शिक्षकांना चोरांसारखी वागणूक का देतात लोक?_

_शैक्षणिक कामांसोबत अगदी सुट्टीतसुद्धा अनेक अशैक्षणिक कामं शिक्षकांकडून शासन करवून घेत असतं, त्याबद्दल पालकांना कल्पना सुद्धा नसते. चालू तासिका डिस्टर्ब करून कधीकधी तातडीने कागदोपत्री माहिती शिक्षकांकडून मागवली जाते. नाही आवडत कुणालाच हातातलं शिकवण्याचं काम टाकून कागद खरडत बसायला, मोबाईलवर ऑनलाईन माहिती भरत बसायला. असंख्य कसरती कराव्या लागतात शिक्षकाच्या नोकरीत..._

_शिक्षक शाळांमध्ये शिकवतात म्हणजे त्यांच्याजवळ उच्चशिक्षण, प्रशिक्षण आणि अनुभव अशा तिन्ही गोष्टी असतात, नोकरीला लागणं एकवेळ सोपं असेल, पण शिक्षकाच्या नोकरीत टिकून राहणं ही सोपी गोष्ट नव्हे. नका उठसूट उपदेश करू शिक्षकांना, त्यांना त्यांचं काम करू द्या. आपल्या पाल्याबाबत आपल्याला काही समस्या असतील तर शिक्षक आनंदाने संवाद साधायला तयार असतात. ते करा, स्वार्थी व्हा, आपल्या मुलांची उत्तमोत्तम प्रगती व्हावी यासाठी हट्ट धरा शिक्षकांकडे, आपल्या मुलांचं कल्याण करून घेण्याचा तो छान मार्ग आहे..._

_आपल्या पाल्याला आवर्जून विचारा, तुला तुझे शिक्षक आवडतात का, आवडत नसतील तर त्या शिक्षकांशी जरूर संपर्क साधा, त्यांच्या संबंधांत काय बिनसतं आहे हे समजून घ्या, त्यावर मार्ग काढा..._

_मुलाला वर्गात करमत नसेल, शिक्षक आवडत नसतील तर ती खरोखरच गंभीर गोष्ट आहे. पण मुलं त्या शिक्षकासोबत आनंदी असतील, तर ठेवा ना विश्वास त्याच्यावर..!! आणि आपली मुलं शाळेत शिकत नसतील तर नका जाऊ शाळांमध्ये चौदा वेळेस डोकवायला, डिस्टर्ब होते तिथली व्यवस्था. दुसऱ्या कुणाच्या तरी मुलांचं नुकसान होतंच ना त्यामुळे..!! आपल्या गावची शाळा, तिची प्रगती झाली पाहिजे म्हणून अवश्य जा शाळेत, पण गेल्यावर भसकन वर्गात नका घुसू, मुलांचं लक्ष विचलित होतं. मुख्याध्यापकांशी चर्चा करा, त्यांच्याशी बोलून गोष्टी ठरवा, छानच आहे ते. गावात उत्तम शैक्षणिक वातावरण तयार करणं, आपल्या गावच्या शाळा आणि शिक्षकांचे हात बळकट करणं हे पुढे जाऊन आपल्याच गावाच्या फायद्याचं ठरतं..._

_एखाद्या गावात फारच मानसिक त्रास झाला तर सरकारी शिक्षक बदली करून दुसरीकडे जातात, त्याने नुकसान त्या शिक्षकांचं होत नाही, मुलांचं होतं हे लक्षात घ्या. त्यात हा कोरोना कंबरडं मोडून गेलाय शिक्षण व्यवस्थेचं, सैरभैर झालंय सगळं. सर्वांनाच त्यातून सावरायचं आहे..._

_पालकांनी मुलांसाठी थोडं स्वार्थी व्हायला हवं. म्हणजे कसं? तर आपल्या गावात आहे त्या शाळेला आणि शिक्षकांना चांगल्या पद्धतीने सपोर्ट करायला हवा, सामंजस्याने शाळेचा विकास करत त्यातून आपल्या गावचं शैक्षणिक वातावरण मजबूत करत रहायला हवं..._🙏🙏🙏🙏


*_हे हक्काने शेअर करा, जास्तीत जास्त पालकां पर्यंत हा संदेश पोहोचवा..._*

प्रा.डॉ.एन.डी.पाटील

  प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचा जीवन क्रम.



संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील

जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म


शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ


अध्यापन कार्य


१९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर

१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य


शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२

शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५

शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८

शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८

सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१

रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून

राजकीय कार्य


१९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

१९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस

१९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य

१९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस

१९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य

१९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )

१९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार

महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते

मिळालेले सन्मान / पुरस्कार


भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४

स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९

राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००

विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी

शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

भूषविलेली पदे


रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य

समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष

अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष

जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक

म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य

प्रसिद्ध झालेले लेखन


समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)

शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२

कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२

शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३

वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६

महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७

शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०

शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )

नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )

रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य


चेअरमन पद काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना,सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक,दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक –प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना 

. असे महान कार्य  करणाऱ्या आपल्या  हक्काच्या माणसाला , सामान्यांचा आवाज असणाऱ्या एन डी पाटील साहेबांना सलाम🙏🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.