blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

मिनी काश्मीर तापोळा सहवास ...

मा.मुख्यमंत्री  एकनाथ जी  शिंदे साहेब ..  अभिनंदन 💐💐💐💐🌹🌹🌹🌹 खूप खूप शुभेच्छा 




  


 







 दिनांक 16/09/2019 रोजी मी दरेतांब शाळा तालुका महाबलेश्वर मधून कार्यमुक्त होऊन कोरेगाव मधील सुभाषनगर शाळेत हजर झालो . सव्वा दोन वर्ष महाबलेश्वर मध्ये काम करताना खुप अनुभव आले . महाबलेश्वर मधील तापोळा, गाढवली, दरेताम्ब, येथील नैसर्गिक वातावरण खुप प्रसन्न, आरोग्यदायी, सकारामत्मक असल्यामुळे शाळेत काम करताना खुप छान वाटले. शिवसागर जलशयात पोहण्याचा आनंद कधीच विसरता येणार नाही. तसेच केंद्रातील शिक्षक यांची टीम घेऊन वासोटा किल्ला नागेश्वरी मंदिर पाहण्याचा आनंद घेता आला. तसेच बोटीतून, लाँच मधून फिरण्याचा मनमुराद आनंद घेता आला. मिनी काश्मीर तापोळा येथील शांतता , सौंदर्य आणि फणसाच्या गरा असतो तशी प्रेमळ माणस जगाच्या पाठीवर कोठेही भेटणार नाहीत. त्याच प्रमाणे मनसोक्त स्टॉबेरी, करवंदे , जांबळे आंबे खाण्याचा योग आला. 


मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब आणि मा. खासदार श्रीकांत शिंदे साहेब , दरेताम्ब, गाढवली ग्रामस्थ यांचे खुप मार्गदर्शन, प्रेम व सहकार्य मिळाले. शाळेमध्ये खुप नवनवीन उपक्रम राबवताना खुप आनंद मिळाला . लेझीम नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम , वनभोजन, परिसर सहल तंबाखु मुक्त शाळा, मूल्यवर्धन, विविध स्पर्धा, परसबाग, वृक्षारोपण, फनी गेम्स , ई -लर्निंग असे अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवले. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली, सर्वांच्या सहकार्याने संगणक प्रिंटर, वॉटर फ़िल्टर, वह्या, दप्तरे, ड्रम , ढ़ोल ताश्या, स्पीकर सेट, कपाट अश्या अनेक वस्तु शाळेला प्राप्त केल्या. 

 








मा.पळसे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि मा. जाधव साहेब मा. चिकने साहेब मा. बावळेकर साहेब, जेष्ठ बंधू दिपक भुजबळ, सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शना मुळे मी केलेल्या कामाबद्दल मला पोहोच पावती म्हणून मला सन 2019 चा महाबलेश्वर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी खुप आभारी असून कायम आपल्या ऋणात राहणे पसंत करेन .

 आपलाच, विजयकुमार किसन भुजबळ मोबाइल 9421177738

वडिलांची जागा.....

 


*वडिलांची जागा कोणालाही घेता येत नाही.*


*👉🏻 म्हणूनच वडिलांच्या रागाला सहन करायला शिका,तरच तुम्ही लायक व्हाल.*


 

*•》》 कोण्या बाहेरच्यांचे ऐकून घेण्यापेक्षा वडिल जे सांगतील ते शांतपणे ऐका.*


*•》》 वडिलांच्या समोर आवाज वाढवून बोलू नका.*


*•》》 वडिलांचा आदर करा. त्यामुळे तुमची मुलं तुमचा आदर करतील.*


*•》》 वडिलांचा सन्मान करा, यातच तुमचे भले होणार.*


*•》》 वडिलांचे म्हणणे ऐका,तुम्ही नक्कीच खुश रहाल.* 


*•》》 वडिलांच्या समोर तुमची नजर झुकवून बोला.*


*•》》 वडील म्हणजे एक पुस्तक आहेत ज्यामध्ये अनुभव लिहिले जातात.* 


*•》》 वडिलांचे अश्रू तूमच्या समोर वाहू देऊ नका.*


*वडील म्हणजे आपल्या जीवनात एक असं व्यक्तिमत्त्व आहे की ते कोणत्याही मापात मोजता येणार नाही. आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पण बाप तो बापच असतो.*


*आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. पण बाप त्या स्वर्गाचे दरवाजे असतो.*

*विचार करा हे दरवाजेच उघडले नाहीत तर स्वर्गात प्रवेश कसा मिळवाल.* 

*बाप मग तो शिक्षित असो वा अडाणी, ज्याला उन्हातान्हात सुद्धा मुलांच्या जीवनाचे कल्याण करण्याची काळजी असते. तुम्ही स्थिरस्थावर झाल्याशिवाय बापाला चैन पडत नाही.*


*बाप असो वा वडील. तो रागीट असो वा व्यसनी पण आपल्या मुलांना प्रेम करण्यात तो कधीच  कमी पडत नाही.*


*रागावलेला बाप शांत झाला की त्याचा जीव मुलाला पाहण्यासाठी कासावीस होतो. हे बाप झाल्याशिवाय कळतच नाही.*


*लक्षात ठेवा सूर्य आगीचा गोळा आहे, धगधगता अग्नी आहे. पण मावळला की सर्वत्र अंधार आहे.*


*म्हणूनच म्हणतो, बाप बाप असतो. आई सारखंच बापाची जागा सुद्धा कोणालाही घेता येत नाही. मन दडपून मुलांना सुखात ठेवण्यासाठी वरून आनंदित आणि हृदय पिळवटून रडणारा बाप कोणालाही कळणार नाही.*


*ज्याने बापाचे काळीज दुखावले तो आयुष्यात कधीच हसत नाही.*


*आणि ज्याने बापाला आयुष्यभर आदराने वागवले तो आयुष्याला दोष देत कधी रडणार नाही.*


 

 *_आपले वडिलांना मान सन्मान देऊन बघा. आयुष्यात कधी काहीच कमी पडणार नाही. 

🙏🙏🙏👍👍👍

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.