blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

लोकराजा

                     

            

          *राजर्षी शाहू महाराज*

         *जन्म : २६ जून १८७४*

(लक्ष्मी-विलास राजवाडा, कागल)

         *मृत्यू : ६ मे १९२२*

                  (मुंबई)

        *अधिकारकाळ*

     इ.स. १८८४ - इ.स. १९२२

          *अधिकारारोहण*

          एप्रिल २, इ.स. १८९४

राज्यव्याप्ती : कोल्हापूर जिल्हा

राजधानी : कोल्हापूर

पूर्ण नाव : छत्रपती शाहू महाराज भोसले

पूर्वाधिकारी : छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी)

राजाराम ३

उत्तराधिकारी : छत्रपती राजाराम भोसले

वडील : आबासाहेब घाटगे

आई : राधाबाई

पत्नी : महाराणी लक्ष्मीबाई भोसले

राजघराणे : भोसले

राजब्रीदवाक्य : जय भवानी

                             शाहू महाराज भोसले  छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे कोल्हापूर राज्याचे इ.स. १८८४-१९२२ दरम्यान छत्रपती व समाजसुधारक होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी अथक प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

💁‍♂️ *जीवन*

          शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन१८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.


🔸 *कार्य*

              शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.


त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. १८९६ चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते.


‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.


                  त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.


स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे


महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.


अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.


मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली.


त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.


तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.


गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारलेे. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये "दलितांचा नेता" व "भारतीय अग्रणी नेता" म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असं आवाहनही महाराजांनी केलं. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले.


शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.


महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले होते. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.


💎 *जातिभेदाविरुद्ध लढा*

         राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.


📖 *शैक्षणिक कार्य*

             शाहू महाराजांनी खालील शाळा सुरू केल्या. १. प्राथमिक शाळा २. माध्यमिक शाळा ३. पुरोहित शाळा ४. युवराज/ सरदार शाळा ५. पाटील शाळा ६. उद्योग शाळा ७. संस्कृत शाळा ८. सत्यशोधक शाळा ९. सैनिक शाळा १०. बालवीर शाळा ११. डोंबारी मुलांची शाळा १२. कला शाळा 


🏤 *शैक्षणिक वसतिगृहे*

       शाहू महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे खालीलप्रमाणे आ झेहेत.


१. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१) २. दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१) ३. वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६) ४. मुस्लीम बोर्डिंग (१९०६) ५. मिस क्लार्क होस्टेल (१९०८) ६. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८) ७. श्री नामदेव बोर्डिंग (१९०८) ८. पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२) ९. श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५) १०. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५) ११. कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५) १२. आर्यसमाज गुरूकुल (१९१८) १३. वैश्य बोर्डिंग (१९१८) १४. ढोर चांभार बोर्डिंग (१९१९) १५. शिवाजी वैदिक विद्यालय वसतिरगृह (१९२०) १६. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस (१९२०) १७. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९२१) १८. नाभिक विद्यार्थी वसतिगृह (१९२१) १९. सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (१९२०) २०. श्री देवांग बोर्डिंग (१९२०) २१. उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक (१९२०) २२. चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर (१९२०) २३. वंजारी समाज वसतिगृह, नाशिक (१९२०) २४. श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक (१९१९) २५. चोखामेळा वसतिगृह, नागपूर (१९२०) २६. छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे (१९२०)


            वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.


🔮 *इतर कार्ये*

          शाहू छत्रपती स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले. 


🤹‍♂️🎭 *कलेला आश्रय*

              राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.


🇮🇳 *स्वातंत्रलढ्यातील योगदान*

     महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.


🙋🏻‍♂️ *पारंपिरिक जातिभेदाला विरोध*

            शाहू महाराजांनी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करून महाराजांना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रूंचे सारे प्रयत्न विफल ठरले.


📚 *शाहूंवरील प्रकाशित साहित्य*

'छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : समग्र पत्रव्यवहार' (संपादन : डॉ. संभाजी बिरांजे प्रकाशन; विनिमय पब्लिकेशन, विक्रोळी, प. मुंबई; ८३ पृष्ठ)

राजर्षी शाहू छत्रपती : अ सोशली रिव्होल्युशनरी किंग (संपादक : डॉ. जयसिंग पवार आणि डॉ. अरुण साधू)

शाहू महाराजांची चरित्रे लेखक : माधवराव बागल, पी.बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ .गो. सूर्यवंशी, डॉ. अप्पासाहेब पवार, जयसिंगराव पवार (यांनी २००१ साली एकत्रितपणे लिहिलेल्या चरित्राची २०१३सालची ३री आवृत्ती ही ३ खंडी आणि १२०० पानी आहे.).

बी.ए. लठ्ठे यांनी १९२६मध्ये शाहूंचे इंग्रजीतील पहिले चरित्र लिहिले. त्याचे मराठी भाषांतरही प्रकाशित करण्यात आले.

राजर्षी शाहू छत्रपती (लेखक : प्रा. डॉ. रमेश जाधव; नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक १८ भारतीय भाषांत प्रकाशित केले आहे.)

राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व शिक्षणकार्य (लेखक: प्राचार्य रा. तु. भगत)

कोल्हापूरचे शाहू छत्रपति : चरित्र व कार्य (लेखक : एकनाथ केशव घोरपडे)

राजर्षी शाहू छत्रपती (खंड काव्यानुवाद, लक्ष्मीनारायण बोल्ली)

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र (तेलुगू, लेखक - लक्ष्मीनारायण बोल्ली)

राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य (लेखक : रा.ना. चव्हाण)

राजर्षी शाहू कार्य व काळ (लेखक - रा.ना. चव्हाण)

समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज- (लेखिका - डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर)

शाहू (लेखक: श्रीराम ग. पचिंद्रे; ही राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील पहिली आणि एकमेव कादंबरी आहे.)

‘प्रत्यंचा : जो लढे दीन के हेत,’ (शाहू महाराजांवरील हिंदी कादंबरी; लेखक - संजीव)

लोकराजा राजर्षी शाहू महाराज (लेखक: सुभाष वैरागकर)

🎞️📺 *चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका*

'लोकराजा राजर्षी शाहू' - दूरचित्रवाणी मालिका

राजर्षी शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर एक चित्रपट आहे. (निर्माते नितीन देसाई)

📜 *पुरस्कार*

शाहू महाराजांच्या नावाने अनेक पुरस्कार जाहीर होतात. अशा काही पुरस्कारांची नावे आणि ते मिळालेल्या व्यक्तींची नावे. :-

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक आणि सामाजिक कार्यकत्या प्रा. पुष्पा भावे यांना (२६ जून २०१८)

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त ६ जिल्हा परिषद सदस्य, ३ पंचायत समिती सदस्य व १५ कर्मचाऱ्यांना राजर्षी शाहू पुरस्कार मिळाला (२६ जून २०१८)

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना (२६ जून २०१७)

🗽 *सन्मान*

शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 'राजर्षी पुरस्कार' रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या,  स्वरुपात दिला जातो. 

*आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती*.

 या व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहायचे  तर त्यांच्या जीवनातील मैलाचे दगड ठरतील असे तपशील "राजर्षी शाहू गौरव ग्रंथ" मधून..


२ एप्रिल, १८९४  :  शाहू छत्रपतींनी राज्यकारभाराची पूर्ण सूत्रे हाती घेतली.  त्याच दिवशी पहिला लोककल्याणकारी जाहीरनामा प्रसिद्ध केला.  त्याच दिवशी पेशवाईत बंद पडलेले शिवशक पुन्हा सुरु केले.

ऑकटोबर १८९९: महाराष्ट्राचे सामाजिक जीवन ढवळून टाकलेल्या,  बहुजन समाजकारण सुरु करणाऱ्या व  शाहू छत्रपतींच्या जीवनास कलाटणी देणाऱ्या वेदोक्त प्रकरणाची सुरवात.

१३ जानेवारी १९००:  कोल्हापूर संस्थानात गोवधबंदी कायदा लागू.

१ मार्च १९०१:  कोल्हापूर संस्थानाची जनगणना 

१८ एप्रिल १९०१:  व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची आणि जैन बोर्डिंगची स्थापना

३१ मे १९०१:  मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना 

७ व ८ मे १९०१:  राजवाड्यातील धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने करण्यासाठी राजपुरोहित नारायण राजोपाध्ये यांना समज देणारी पत्रे

६ मे १९०२:  राजपुरोहित राजोपाध्ये यांना बडतर्फ  केले व त्याच्या इनामी जमिनी जप्त करून त्यांचे सर्व अधिकार काढून घेतले.

१ सप्टेंबर १९०२:  मागासवर्गीयांसाठी ५० टक्के राखीव जागा ठेवण्याच्या जाहीरनाम्यासाठी हातकणंगले नगरपालिकेकडून शाहू छत्रपतींचा सत्कार

९ मे १९०५:  राजपुरोहित उपाध्ये यांनी विविध ब्रिटिश शासन स्तरावर अपयशी झाल्यावर शेवटी दिल्लीला भारत सरकारकडे केलेले अपील शेवटी फेटाळले गेले.

१० जुलै १९०५:  करवीर पिठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांनी शाहू छत्रपतींचे वेदोक्ताचे धार्मिक अधिकार मान्य केले.

२५ जून १९०८:  धार्मिक दहशतवाद्यांचा शाहू छत्रपतींना बॉम्ब स्फोट घडवून आणून ठार मारण्याचा अयशस्वी प्रयत्न

जुलै १९०८:  शाहू छत्रपतींना निनावी पात्र लिहून धार्मिक दहशतवाद्यांनी खुनाची धमकी दिली. 

११ जानेवारी १९११:  कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना 

१ सप्टेंबर १९११:  मुलीचा मुलगा दत्तक घेण्यास हिंदूंना परवानगी देणारा हुकूम

१५ जुलै १९१२:  सहकारी पतसंस्था कायदा पारित केला 

१६ नोव्हेंबर १९१२:  फासेपारध्यांच्या घरबांधणी प्रकल्पास मान्यता दिली

जानेवारी १९१३:  राधानगरी धरणाचे काम वेगाने सुरु

२३ मे १९१३:  इनाम जमिनीच्या तुकडीकरणास प्रतिबंध करणारा कायदा

१ जून १९१३:  सर्व सहकारी संस्थांसाठी कायदा संस्थानात लागू केला

२८ जून १९१३:  प्रत्येक गावात शाळा स्थापनेचा जाहीरनामा 

२ ऑगस्ट १९१३:  कुलकर्णी पदासाठीच्या परीक्षेस बसण्यास मराठा विद्यार्थ्यांना परवानगी

३० सप्टेंबर १९१३:  दि कोल्हापूर अर्बन को.ऑप.बँकेची स्थापना

ऑकटोबर १९१४:  कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृहाची सुरवात

डिसेम्बर १९१४:  सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवछत्रपती मूर्तीची दुरुस्ती

१० जून १९१६:  करवीर पिठाचे शंकराचार्य म्हणून डॉ. कुर्तकोटी यांची नियुक्ती

२७ जून १९१६:  "जयसिंगपूर" या बाजारपेठ वसाहत (शहर) निर्मितीचा आदेश

२५ जुलै १९१७:  प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले

२७ जुलै १९१७:  विधवा पुनर्विवाहाचा कायदा व विवाह नोंदणी कायदा लागू केला

५ जानेवारी १९१८:  भारताच्या व्हॉईसरॉय बरोबर मागासलेल्या जाती आणि अस्पृश्यांना जातवार प्रतिनिधित्व-मतदारसंघ देण्यासंबंधी चर्चा

१९ जानेवारी १९१८:  कोल्हापुरात आर्य समाज आणि सत्यशोधक समाज यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले

३० जानेवारी १९१८:  शाहू छत्रपतींना खुनाची धमकी देणारी भिंतीपत्रके कोल्हापूर शहरात लावण्यात आली.

४ फेब्रुवारी १९१८:  संस्थानात हिंदू-जैन आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा लागू केला 

२२ फेब्रुवारी १९१८:  बलुतेदारी पद्धत नष्ट करण्याची घोषणा

२३ फेब्रुवारी १९१८:  कुलकर्णी  नष्ट करून त्या ऐवजी तलाठी पद्धत सुरु

२८ फेब्रुवारी १९१८:  मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासाठी स्वतंत्र खाते निर्माण केले 

१२ मार्च, १९१८:  सावकारी नियंत्रण कायदा पारित केला

२५ मार्च १९१८:  सर्व जातीतील गरीब विद्यार्थ्यांना मॅट्रिकपर्यंत मोफत शिक्षणाची व्यवस्था

२५ मार्च १९१८:  सरदार, जहागीरदार, इनामदार यांच्यावर त्यांच्या जमिनीच्या प्रमाणात जादा करआकारणी 

१३ जुलै १९१८:  संस्थानात प्रायोगिक तत्वावर ग्रामपंचायती सुरु केल्या

१ ऑगस्ट १९१८:  महार, मंग, रामोशी, बेरड या तथाकथित गुन्हेगारी जमातींची हजेरी पद्धत कायद्याने बंद केली.

८ ऑगस्ट:  तलाठी म्हणून नेमणूक करतांना अस्पृश्यांना प्राधान्य, त्यांना दरबारात योग्य प्रकारे बढती देण्याचा आदेश, जातीच्या कारणास्तव अस्पृश्य व्यक्तीला शासकीय नोकरी नाकारता येणार नाही असा आदेश

२६ डिसेंबर १९१८:  स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्या निरनिराळ्या शाळा बंद करून सर्वांसाठी एकच शाळा सुरु करण्यासाठीचा हुकूम 

१ जानेवारी १९१९:  अस्पृश्यांना वैद्यकीय सेवा देतांना समतेचे तत्व पाळण्याची, तसेच अस्पृश्य विद्यार्थ्यांना समतेची वागणूक देण्याची आज्ञा

२८ मार्च १९१९:  पंचांगावर शिवशक नोंदविण्याचा हुकूम

१९ एप्रिल १९१९:  कानपुर येथे अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेने छत्रपतींना "राजर्षी" ही पदवी दिली

२ ऑगस्ट १९१९:  स्त्री छळवणूक प्रतिबंधक कायदा आणि घटस्फोट कायदा मान्य केला 

२६ ऑगस्ट १९१९:  किमान संख्येने अस्पृश्य तलाठी नेमण्याचा कायदा

६ ऑक्टोबर १९१९:  सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळली जाऊ नये म्हणून कायदा

८ ऑकटोबर १९१९:  मागासलेल्या जातीतील विद्यार्थिनींना मोफत शिक्षण आणि मोफत वसतिगृहाची सोय केली जाईल असा जाहीरनामा 

१७ जानेवारी १९२०:  औरस आणि अनौरस ही मालमत्तेच्या वारसासंबंधी असणारी तफावत नष्ट करणारा नवीन हिंदू वारसा कायदा मान्य केला व हाच कायदा देवदासी, जोगतिणी यांनाही लागू केला

३१ जानेवारी १९२०:  डॉ.आंबेडकर यांच्या "मूकनायक" पत्रकाला आर्थिक मदत केल्यामुळे त्याचा प्रारंभ

३ मे १९२०:  अस्पृश्य लोकांची वेठबिगारी रद्द करण्याचा कायदा केला 

३० मे, १९२०: नागपूर येथील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्षस्थान 

१५ जुने १९२०:  राजवाड्यातील सर्व धार्मिक विधी मराठा पुरोहितांच्या हस्ते करण्याची राजाज्ञा

३ सप्टेंबर १९२०:  महार समाजाच्या जमिनी रयत म्हणून दिल्या

२५ सप्टेंबर १९२०:  ब्राह्मण लोकांसाठी राखीव असलेल्या अंबाबाई मंदिर परिसरातील हौदात सत्यशोधक श्री रामचंद्र जाधव यांनी जाणीवपूर्वक स्नान केले 

२५ सप्टेंबर १९२०:  ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्ष तीव्र झाला. परिणामी छत्रपतींनी अंबाबाई मंदिर परिसरातील हौद सर्वांना खुला केला.

३ ऑकटोबर १९२०:  छत्रपतींच्या अध्यक्षतेखालील शिवाजी मेमोरियल सोसायटीची वार्षिक सभा पुण्यात सुरु असतांना लो.टिळकांच्या अनुयायांनी त्यात गोंधळ घातला.

१२ ऑकटोबर १९२०: छत्रपतींनी क्षात्रजगद्गुरू पदी सदाशिव पाटील यांची नेमणूक केली. 

१६ फेब्रुवारी १९२२:  दिल्ली येथे भरलेल्या अस्पृश्यांच्या परिषदेत छत्रपतींचे भाषण 

६ मे १९२२:  शाहू छत्रपतींचे महानिर्वाण


          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳


🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

          

               स्त्रोत ~ Wikipedia

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.