blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

प्रकाशाचे परिवर्तन..

 कोणत्याही प्रकाशीय स्रोतापासूनचे प्रकाशाचे संक्रमण सरळ रेषेत असते. किंवा प्रकाश किरण सरळ रेषेत जातात.


प्रकाशाच्या मार्गात एखादी अपारदर्शक वस्तू धरल्यास किंवा आल्यास त्याची छाया पडद्यावर पडते.


एखाद्या पृष्ठभागावर प्रकाशकिरणे पडली, की ती परत फिरतात, त्याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात.


आरशात पाहताना तुमच्या चेहऱ्यावरून निघालेले प्रकाशकिरण आरशावरून परावर्तित होऊन तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे चेहरा आरशात दिसतो, यास आरशातील प्रतिमा म्हणतात. सपाट आरशातील प्रतिमा सरळ असते, तसेच ती मूळ वस्तूएवढीच असते. 

सपाट आरशातील प्रतिमा आरशाच्या मागे असते. प्रतिमा आरशाच्या मागे तेवढ्याच अंतरावर असते. सपाट आरशामध्ये वस्तू आणि प्रतिमा यात डावी आणि उजवी बाजू यांची आलटापालट होते.


रुग्णवाहिकेवरील OMALJUBIMA ही अक्षरे आरशात AMBULANCE दिसतात प्रकाशाचा एक किरण आरशाला जाऊन मिळाल्यास त्यास आपाती किरण म्हणतात.


आपाती किरण आरशावर जेथे पडतो तेथून एक उभा अभिलंब काढा ती स्तंभिका असते.


आपती किरणाने स्तंभिकेशी केलेल्या कोनाला आपतन कोन ∠i म्हणतात. परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेल्या कोनाला परावर्तन कोन ∠ म्हणतात.


प्रत्येक वेळी आपाती कोन आणि परावर्तित कोन ∠ हे सारखेच (एकरूप) असतात.


आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका कागदावर म्हणजे एकाच प्रतलात असतात.


परावर्तनाचे नियमः


(1) आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात.


(2) आपाती किरण आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुध्द बाजूस असतात.


3) आपाती कोन आणि परावर्तित कोन समान मापाचे असतात. (


गुळगुळीत पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होत असल्यास त्यास नियमित परावर्तन म्हणतात.


गुळगुळीत पृष्ठभागावर आपाती किरण समांतर पडत असतील, तर सगळ्यांचे -


(1) आपाती कोन सारखे म्हणजे समान असतात.


(2) तसेच परावर्तित कोन सारखे म्हणजे समान असतात.


(3) सर्व परावर्तित कोन आपतन कोनाएवढेच असतात. अशा परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात. - खडबडीत पृष्ठभागावर आपाती किरण समांतर पडले, की परावर्तन किरण समांतर न पडता ते विस्तृत पृष्ठभागावर पसरतात. अशा परावर्तनास अनियमित परावर्तन म्हणतात.


- सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडून त्याचे परावर्तन होते. चंद्राच्या प्रकाशामुळे आरशावरून त्याचे दुसरे परिवर्तन होते. अशा प्रकारे अनेक वेळा परावर्तन होऊ शकते.


समांतर आरशांपासून अगणित प्रतिमा मिळतात.


• आरशातील प्रतिमांची संख्या = 360/ दिलेला कोन -1

* परिदर्शीचा उपयोग पाणबुडींमध्ये पाण्याच्या पृष्ठभागाखाली राहून बाहेरच्या वस्तूंची टेहळणी करण्यासाठी करतात.


* एक मोठे नळकांडे घ्या. त्यात तीन आरसे एकमेकांशी 60° चे कोन करून बसवा. नळकांड्यात काचेचे रंगीत पाच सहा तुकडे टाका. नळकांड्याच्या झाकणाला एक बारीक छिद्र पाडून त्यातून पाहिल्यास असंख्य रंगीबेरंगी प्रतिमा दिसतात. येथे तीन आरशांमुळे वस्तूंचे अनेक वेळा परावर्तन झाल्यामुळे अनेक प्रतिमा दिसतात.


* रस्त्याच्या कडेच्या फ्लेरोसेंट पेंटवर प्रकाश पडला की ते चमकतात, ते चटकन दिसतात आणि वाहनचालक सावध होतो...

निवडणूक अनामत रक्कम (Security Deposit)

 निवडणूक अनामत रक्कम (Security Deposit) म्हणजे नेमकं काय?


निवडणुकीसाठी अर्ज भरताना उमेदवाराला त्यांच्या जिल्ह्यात किंवा ज्या ठिकाणी निवडणूक आहे तिथं निवडणूक आयोगानं एक अधिकारी नेमलेला असतो त्या अधिकाऱ्याकडे एक विशिष्ट रक्कम जमा करावी लागते त्याला अनामत रक्कम म्हणतात.


हे पैसे रोख स्वरुपात किंवा उमेदवाराच्या नावानं सरकारी तिजोरी पैसे जमा केल्याची पावती निवडणूक अर्जासोबत जोडायची असते. पण, ही अनामत रक्कम का जमा केली जाते? तर प्रामाणिकपणे निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज दाखल करावे, इतर कोणीही अर्ज दाखल करू नये यासाठी ही अनामत रक्कम घेतली जाते.

कोणत्या निवडणुकीसाठी किती डिपॉझिट?


सर्व निवडणुकांसाठी ही अनामत रक्कम सारखीच असते का? तर नाही. प्रत्येक निवडणुकांनुसार अनामत रक्कम बदलत असते. 1951 च्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार,


लोकसभा निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला 25 हजार रुपये अनामत रक्कम निवडणुकीचा अर्ज भरताना द्यावी लाते. पण, उमेदवार जर अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जमातीचा असला तर त्यांना या रक्कमेतून 50 टक्के सूट देण्यात आली आहे. म्हणजे या समाजातील उमेदवाराला फक्त 12500 रुपये अनामत रक्कम भरावी लागते. राज्यसभेच्या निवडणुकीसाठीही लोकसभेसारखीच अनामत रक्कम द्यावी लागते.


विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठी 10 हजार रुपये अनामत रक्कम ठरवून दिलेली आहे, तर अनुसूचित जाती आणि जमातींच्या उमेदवारांना 5 हजार रुपये भरावे लागतात.


राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत देखील 15 हजार रुपयांची अनामत रक्कम द्यावी लागते.

डिपॉझिट जप्त का केलं जातं?


पण, निवडणुकीनंतर काही उमेदवारांची अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट जप्त होत असते. मग डिपॉझिट जप्त होणे म्हणजे नेमकं काय?


1951 च्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, उमेदवाराला एकूण वैध मतांच्या 1/6 मतं मिळाले नसतील तर अशा उमेदवारांचं सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केलं जातं. ज्या उमेदवारांना 1/6 मतं मिळतात त्यांचं डिपॉझिट निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर परत केलं जातं.

एखाद्या उमेदवाराचा निवडणुकीच्या आधी मृत्यू झाला असेल किंवा त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला असेल तर अशा उमेदवाराचं सिक्युरीट डिपॉझिट परत केलं जातं.

एकच उमेदवार दोन मतदारसंघातून निवडणूक लढत असेल आणि त्या उमेदवाराला एकूण मतांच्या 1/6 मतं मिळाली असतील तरी त्याला फक्त एक अनामत रक्कम परत केली जाते. इतर मतदारसंघातील अनामत रक्कम जप्त केली जाते.

अनामत रक्कम परत मिळविण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा असतो. यावेळी या अर्जात तुम्ही इतर मतदारसंघातून निवडणूक लढली होती का? असा प्रश्न विचारला जातो. जर दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढली असेल तर त्या मतदारसंघातल्या अनामत रकमेसाठी अर्ज केला नाही असं त्या उमेदवाराला जाहीर करावं लागतं.

आपली सूर्यमाला

 खगोलीय वस्तू सूर्य, ग्रह, चंद्र, तारे आहेत.

सूर्य ताऱ्याभोवती बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी आणि युरेनस असे एकूण आठ ग्रह निरनिकक्षांत परिभ्रमण करतात. 

आंतरराष्ट्रीय खगोल समितीने 2006 पासून प्लुटोला ग्रह न मानता 'ब्रटुग्रह' असे संबोधण्यात या अंतिम निर्णय दिला.

चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.


पृथ्वीच्या सर्वात जवळची खगोलीय वस्तू चंद्र आहे.

पृथ्वीपासून चंद्राचे सरासरी अंतर 384400 किमी आहे.

दररोज चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा 50 मिनिटे उशीरा होतो.

चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करताना स्वतःभोवतीही फिरत असतो.

चंद्राला पृथ्वीभोवती व स्वतःभोवती एक परिभ्रमण करण्यास 27.3 दिवस लागतात स्वतःभोवती फिरणे म्हणजे परिवलन होय. म्हणून चंद्राची एकच बाजू आपण पाहू शकतो. पौर्णिमेला चंद्र पूर्ण (गोलाकार) असतो त्यानंतर तो लहान लहान होत जाऊन शेवटी अमावस्या ला चंद्र दिसत नाही. अमावास्येनंतर पुन्हा चंद्र थोडा थोडा रोज वाढत जातो. याला चंद्राच्या कलाम चंद्राच्या परिवलनाने आणि परिभ्रमणाने प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या कला वाढत जातात चंद्राच्या कला कमी कमी होत जातात. अमावास्येला चंद्र आकाशात दिसत नाही. एका अमावास्येपासून दुसऱ्या अमावास्येपर्यंतचा काळ 29.5 दिवसांचा असतो.


उन्हाळ्यात रात्री आकाशात सात ताऱ्यांची एक विशिष्ट जोडणी दिसते; त्यास सप्तर्षी असे म्हणत हिवाळ्यात मृग नक्षत्र पटकन दिसते. यात 7-8 ताऱ्यांपैकी चार तारे एका चौकोनाचे चारबिंदू अस मृग नक्षत्राच्या मधल्या तीन ताऱ्यांपासून पूर्वेच्या दिशेने एक रेषा काढल्यास ती एका तेजस्वी ताऱ्या तोच व्याध तारा आहे.


वृश्चिक तारकासमूहात 10-12 तारे दिसतात. त्यातील सर्वांत तेजस्वी तारा ज्येष्ठा होय.. वृश्चिक तारकासमूह दक्षिण गोलार्धाच्या आकाशात विषुववृत्ताच्या खाली दिसत्तो.


आपण आपल्या सोईसाठी आकाशाचे 88 भाग केले आहेत. प्रत्येक भागात एक तारकासमूह आ 88 तारकासमूहांपैकी 37 तारकासमूह उत्तर खगोलीय आणि 51 तारकासमूह दक्षिण खगोलीय ज प्राचीन भारतीय अभ्यासकांनी नक्षत्रांची संख्या 27 कल्पिली आहे.


चंद्र क्रमाक्रमाने वेगवेगळ्या नक्षत्रांच्या दिशेने दिसतो.


आपल्या सूर्यमालेत ।) सूर्य ii) त्यासभोवती परिभ्रमण करणारे आठ ग्रह, iii) त्यांचे चंद्र i v) धूमकेतू आहेत.


विश्व विस्तीर्ण आहे. विश्वात आपल्या सूर्यासारखे अनेक सूर्य आणि त्यांच्या सूर्यमाला आहेत. 

आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य हा एक तारा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6000° C (से) आहे. आपल्या सूर्याच्या आकारात आपल्या पृथ्वीसारख्या 13 लाख पृथ्वी बसू शकतात.


सूर्याच्या गुरूत्वीय बलामुळे सूर्याभोवती इतर खगोलीय वस्तू फिरतात.


एखाद्या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणाऱ्या काळास त्या ग्रहाचा परिभ्रमण काळ असे म्ह


बुध ग्रहाचा परिभ्रमण काळ केवळ 88 दिवसांचा आहे.


नेपच्यून ग्रहाचां परिभ्रमण काळ सुमारे 146 वर्षे आहे.


ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करीत असताना ते स्वतःभोवतीही फिरतात, त्याला ग्रहाचे परिवलन असे म्ह आणि काळास एक परिवलन काळ म्हणतात. काही ग्रहांभोवती लहान खगोलीय ग्रह परिभ्रमण करतात. त्यांना त्या ग्रहाचे उपग्रह म्हणजेच चंद्र म्ह


मंगळ ग्रहाला दोन चंद्र आहेत.


शनी ग्रहाला 60 पेक्षा अधिक चंद्र आहेत.


बुध ग्रह हा सर्वांत लहान ग्रह आहे. बुध ग्रहाला एकही चंद्र नाही.


पृथ्वीला सर्वांत जवळचा ग्रह शुक्र आहे. शुक्र ग्रहाला एकही चंद्र नाही. शुक्र ग्रह स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे परिवलन करतो.


आपल्या चंद्राप्रमाणे शुक्र ग्रहाला कला असतात.


सूर्यमालेतील ग्रहांपैकी पृथ्वी या एकाच ग्रहावर जीवसृष्टी आहे.


पृथ्वीच्या कक्षेच्या आत असलेल्या ग्रहांना (येथे बुध आणि शुक्र) अंतर्ग्रह म्हणतात.


पृथ्वीच्या कक्षेबाहेरील ग्रहाना (येथे मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून) बाह्यग्रह असे म्हणतात.


गुरू हा सर्वांत मोठा ग्रह आहे. गुरू ग्रहाचा परिवलन काळ 10 तास केवळ आहे.


गुरूला एकूण 63 चंद्र आहेत; त्यांपैकी चार चंद्र दिसतात.


शनि ग्रहाची घनता पाण्यापेक्षा म्हणजे 1 पेक्षा कमी आहे.


युरेनस आणि नेपच्यून हे दोन्ही ग्रह सूर्यमालेच्या टोकाचे ग्रह आहेत.


युरेनसचे परिवलन पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे.


मंगळ आणि गुरू या बाह्यग्रहांमध्ये लहान लहान खगोलीय अवशेष फिरताना दिसतात, त्यांना लघुग्रह असे म्ह


धूमकेतू सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात. धूमकेतूच्या शीर्षस्थानी एक तेजस्वी गोल असतो


त्याला एक लांब पुच्छ (शेपटी) असते. शेपटी सूर्याच्या विरुध्द बाजूने असते.


हॅलेचा धूमकेतू 76 वर्षांनी एकदा दिसतो. तो 1984 साली दिसला होता.


मानवाच्या कल्याणासाठी, उत्कर्षासाठी भारताने पृथ्वीच्या कक्षेत मानवनिर्मित किंवा कृत्रिम उपग्रह सोडले आहेत.


कृत्रिम उपग्रह चंद्रापेक्षा कमी उंचीच्या अंतरावरून पृथ्वीभोवती परिभ्रमण करतात.


19 एप्रिल 1975 रोजी भारताने पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला.


भारताने एकाच वेळी दहा उपग्रह अवकाशात सोडले आहेत.


'इस्रो' (ISRO) संस्थेमार्फत आतापर्यंत 21 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. त 11 मानवनिर्मित उपग्रह कार्यरत आहेत.

कृत्रिम उपग्रहांचा आपण विविध प्रकारे उपयोग करून घेत आहोत. 1) पृथ्वीवरून अवकाशात संपर्क साधणे, (संदेशवहन करणे.)


2) हवामानाचा अंदाज वर्तवणे.


3) दूरसंचार, रेडिओ आणि दूरदर्शन प्रक्षेपण करणें.


4) अवकाश संशोधन करणे.


5) शैक्षणिक कार्यक्रम राबवणे,


6) अचूक भौगोलिक नकाशे बनवणे.


रेडिओ दुर्बीण : GMRT म्हणजे जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) या संस्थेने ही दुर्बीण पुणे-नाशिक हमरस्त्यानजीक नारायणगाव जवळील खोडद येथे उभारली आहे.


जगातील एकमेव दुर्बीण असून जगातील सर्व संशोधक, शास्त्रज्ञ येऊन सूर्यमाला, पल्सार, महास्फोटक तारा(सुपरनोव्हा) यांचा अभ्यास करतात.अंतराळवीर आपल्याप्रमाणे स्थायू व द्रवरूपात अन्न ग्रहण करू शकतात.


त्यांचे अन्न पॅकेटमध्ये बंद असते. जेणे करून अन्न हवेत न उडता अंतराळवीर ते नीट खाऊ शकतात.

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.